राज्यातील हजारो महसूल अधिकाऱ्यांनी मागील ३ एप्रिलपासून सुरू असलेले आपले  कामबंद आंदोलन  आज, गुरुवारी मागे घेतले. शासनाने नायब तहसीलदारांना ४८०० रुपये ग्रेड पे देण्यास तत्वतः मान्यता देत त्यासंदर्भातील कार्यवाही एप्रिलअखेर करण्याचे ठोस आश्वासन दिले आहे. त्यामुळे हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आल्याचे महाराष्ट्र् राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश बगळे, राहुल मुंडके, मनोहर पोटे व बाळासाहेव वाकचोरे यांनी जाहीर केले.

हेही वाचा >>> आंदोलनकर्त्या महसूल अधिकाऱ्यांच्या जागी इतर अधिकाऱ्यांची नियुक्ती; शासनाची कठोर भूमिका, आंदोलन चिघळण्याची चिन्हे

Due to assembly elections instructions have issued regarding school continuity on November 18 19
शाळा सुरू ठेवण्याबाबत शिक्षण आयुक्तांच्या सुधारित सूचना… होणार काय?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
investors of DSK, Maval-Mulshi sub-divisional magistrate, Court, DSK,
‘डीएसके’ यांच्या गुंतवणूकदारांची यादी सादर करण्याचे मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश
congress rajya sabha mp abhishek manu singhvi at loksatta loksamvad event
आरक्षणावर सर्वोच्च न्यायालय विरुद्ध सारे राजकीय पक्ष
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…
Supreme Court on bulldozer action (1)
अतिक्रमणविरोधी कारवाईवेळी ‘हे’ नियम पाळा, थेट सर्वोच्च न्यायालयानंच घालून दिली नियमावली!
supreme court rejects sebi penalty on mukesh ambani In rpl shares case
सर्वोच्च न्यायालयाचा मुकेश अंबानींना दिलासा; ‘आरपीएल शेअर्स’प्रकरणी ‘सॅट’च्या आदेशाला सेबीचे आव्हान फेटाळले!

यापूर्वी आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी ( दि. ५) महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व  पदाधिकारी यांच्यात झालेली चर्चा फलदायी ठरली. मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांनी ‘ग्रेड-पे’च्या मागणीला मान्यता दिल्याचे बगळे यांनी स्पष्ट केले. यासंदर्भातील प्रशासकीय कार्यवाही करण्यास व शासन निर्णय काढण्यासाठी एप्रिलअखेर पर्यंतचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर केले. दरम्यान, जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी तहसीलदार व नायब तहसीलदार आज कामावर रुजू होत असल्याचे  जिल्हाध्यक्ष आर.एन. देवकर यांनी सांगितले.