नागपूर: केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या राष्ट्रीय महामार्ग निर्माण खात्याने मागील पाच वर्षांत नवीन राष्ट्रीय महामार्ग निर्माण, विकास व त्याच्या देखभाल- दुरूस्तीवर सर्वाधिक १ लाख कोटी रुपयांहून अधिकचा खर्च महाराष्ट्रात केला. उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, बिहारलाही भरघोस निधी (प्रत्येकी चाळीस हजार कोटी) दिला गेला.
राष्ट्रीय महामार्ग निर्माण खात्याच्या आकडेवारीनुसार, देशात मागील पाच वर्षांत (वर्ष २०२० ते २०२४ दरम्यान) ५६ हजार ७०५ किलोमिटर नवीन राष्ट्रीय महामार्ग निर्मिती, विकासासह त्याच्या देखभाल दुरूस्तीवर ८ लाख २५ हजार ७७७ कोटी रुपयांचा खर्च केला गेला. त्यापैकी सर्वाधिक १ लाख १ हजार ८८७ कोटी रुपयांचा खर्च महाराष्ट्रात झाला. उत्तर प्रदेशातही ४ हजार १७ किलोमिटर महामार्गासाठी ९५ हजार ६५४ कोटी रुपयांचा खर्च झाला.
गुजरातमध्ये २ हजार १८२ किलोमिटर राष्ट्रीय महामार्गावर ४४ हजार ७६ कोटी, राजस्थानमध्ये ४ हजार १४८ किलोमिटरवर ४३ हजार ८०१ कोटी, बिहारमध्ये २ हजार ४४८ किलोमिटर महामार्गावर ४० हजार ३७८ कोटी, कर्नाटकात २ हजार ४७८ किलोमिटर महामार्गावर ४० हजार ८३७ कोटी रुपये खर्च करण्यात आला. आंध्र प्रदेशात २ हजार ६८६ किलोमिटर महामार्गासाठी ३५ हजार १८६ कोटी, हरियाणामध्ये १ हजार ५७४ किलोमिटर महामार्गासाठी ३४ हजार ५६१ कोटी, केरळमध्ये १ हजार ६० किलोमिटरसाठी ३८ हजार ६४५ कोटी, मध्य प्रदेशात ३ हजार ९२० किलोमिटरसाठी ३७ हजार ३४२ कोटी, पंजाबमध्ये १ हजार ३६५ किलोमिटरसाठी ३५ हजार ७६९ कोटी रुपये, तामिळनाडूत २ हजार ६२६ किलोमिटरसाठी ३३ हजार ८५ कोटी, जम्मू आणि काश्मीमध्ये १ हजार ३ किलोमिटरसाठी २९ हजार ९०३ कोटी रुपये खर्च केल्याचेही राष्ट्रीय महामार्ग निर्माण खात्याच्या अहवालातून पुढे आले आहे. या वृत्ताला एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर दुजोरा दिला.
राष्ट्रीय महामार्गावर झालेला खर्च
राज्य | कोटी खर्च | किलोमिटर |
अरुणाचल प्रदेश | १२,१८६ | २,६८६ |
आसाम | २३,०३३ | १,७१४ |
छत्तीसगढ | १२,५३६ | १,२५९ |
गोवा | ३,६१९ | १७२ |
हिमाचल प्रदेश | १६,१४४ | ७०० |
झारखंड | १५,५१८ | १,४४६ |
मणिपूर | ९,६३५ | १,२१९ |
मेघालय | ५,०६८ | ३२१ |
मिजोरम | ९,९५१ | ८६३ |
नागालँड | ८,४०८ | ९१४ |
सिक्किम | ३,८४२ | २४० |
तेलंगणा | ३३,०८५ | २,६२६ |
त्रिपुरा | ४,९८८ | ५१५ |
उत्तराखंड | १५,६१६ | १,७२३ |
पश्चिम बंगाल | १५,५६१ | १,२१५ |
दिल्ली | १२,१२३ | १५९ |
लद्दाख | १,६०८ | १४३ |
पुडूचेरी | ११९ | २१ |