नागपूर: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकालाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. निकाल कधी लागणार यासंदर्भात महत्त्वाची माहिती शिक्षण मंडळातील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. मागील वर्षी दहावीचा आणि बारावीचा निकाल हा २० मे नंतर जाहीर झाला होता. परंतु, यावर्षी दहा दिवसांपूर्वीच निकाल जाहीर होणार आहे. अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बारावीचा निकाल ९ मे रोजी तर दहावीचा निकाल १० रोजी जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर, लातूर, पुणे, नाशिक, नागपूर, कोकण, अमरावती, कोल्हापूर, मुंबई विभागातील बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झाले. उत्तरपत्रिकांची वेळेत तपासणी व्हावी यासाठी मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. तपासलेल्या उत्तरपत्रिका बोर्डात जमा करण्यासाठी ८ एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली होती. ८ एप्रिलपर्यंत जवळपास पूर्ण उत्तरपत्रिका तपासून जमा झाल्याची अधिकाऱ्यांनी दिली. यंदा शिक्षण मंडळाकडून दहावी, बारावीच्या परीक्षाही लवकर घेण्यात आल्या होत्या. यंदा बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान घेण्यात आली होती. तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीला घेण्यात आली होती.
छत्रपती संभाजीनगर, लातूर, पुणे, नाशिक, नागपूर, कोकण, अमरावती, कोल्हापूर, मुंबई विभागातील बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झाले. २०२५ साली परीक्षा लवकर झाल्याने निकालही लवकर लागेल असे, शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे. जून महिन्यात पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होत असल्याने यंदा मे महिन्यातच निकाल लावणार असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले. निकालाची अधिकृत तारीख अजून बोर्डाने जाहीर केलेली नाही. परंतु बोर्डातील अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बारावीचा निकाल हा ९ मे रोजी तर दहाविचा निकाल १५ मे दरम्यान जाहीर होणार आहे.
प्रवेश प्रक्रियेला लवकरच सुरुवात
१५ मेला बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच प्रवेशाची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर दहावीच्या निकाल जाहीर होण्याआधीच अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे तुम्ही उन्हाळ्यातील सुट्टीचे नियोजन करत असाल तर या तारखा सांभाळून तुम्हाला नियोजन करणे सोयीस्कर राहणार आहे. अकरावी प्रवेशाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. महापालिका क्षेत्रातील शाळांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने केली जाते.