वर्धा : राज्य लोकसेवा आयोग अर्थात महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे सरकारी नोकऱ्यांचे आगार. प्रत्येक बेरोजगार आयोगाच्या जाहिरातीकडे लक्ष ठेवून असतो. पात्रतेनुसार जागा निघाल्या की त्यासाठी अर्ज करण्याची धावपळ उडते. यात वयोमर्यादा ही एक महत्वाची अट असते. ती पात्र नं करणारा उमेदवार मग नाराज होत नशिबाला कोसतो, अशी उदाहरणे दिसून येतात.
पण आता लोकसेवा आयोगातर्फे एक सवलत देण्याची घोषणा राज्य शासनाने केली आहे. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ तसेच महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त परीक्षा २०२४ अपेक्षित. यासाठी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. या परीक्षेची वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना वाढीव मुदत मिळणार. एक वर्षाची वाढ देण्यात येत असल्याचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी ही घोषणा केली आहे.
विधान परिषदेत मंत्री शेलार यांनी ही माहिती दिली. भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना नव्याने संधी देण्यासाठी सरकारने काही पाऊल उचलले का व असेल तर काय, असा प्रश्न प्रवीण दरेकर यांनी मांडला. त्यावर उत्तर देतांना मंत्री शेलार यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले की वयोमर्यादा वाढवावी अशी मागणी पुढे येत होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुदत वाढवून देण्याची निवेदने प्राप्त झाली होती.
या मागणीचा सकारात्मक विचार झाला पाहिजे, अशी भूमिका आली. ते लक्षात घेऊन अराजपात्रित गट ब मधील पोलीस उपनिरीक्षक व अन्य परीक्षेसाठी एक वर्षाची वयोमर्यादा वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे, असे उत्तर मंत्री आशिष शेलार यांनी दिले.
सद्यस्थितीत महाराष्ट्र नागरी सेवा राजपात्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५, महाराष्ट्र अराजपात्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त परीक्षा २०२४ अश्या तीन परीक्षा पैकी गट ब ही दुसरी व गट क या दोन परीक्षांच्या वयोमर्यादा वाढीसाठी मागणी झाल्याने त्यातील काही पदांसाठी एक वर्षाची वयोमर्यादा वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे आशिष शेलार यांनी स्पष्ट केले. वयोमर्यादेत झालेली ही वाढ अनेकांना संधी देणार असल्याचे म्हटल्या जाते.