नागपूर : निर्भया बलात्कार-हत्याकांडानंतर प्रत्येक राज्यातील शहर आणि जिल्ह्यात स्वतंत्र महिला पोलीस ठाण्याची निर्मिती करण्याचा निर्णय तत्कालीन केंद्रीय मंत्र्यांलयातून घेण्यात आला होता. मात्र, महाराष्ट्रात अजुनही एकही स्वतंत्र महिला पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली नाही. तामिळनाडूत सर्वाधिक १९९ तर उत्तरप्रदेशात ७१ स्वतंत्र महिला पोलीस ठाणे सुरू झाले आहेत. राज्यात महिलांवरील बलात्कार, विनयभंग, अश्लील कृत्यांसह लैंगिक अत्याचार आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे सामाजिक सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महिलांसंदर्भातील गुन्ह्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी महिला पोलीस अधिकारी आणि महिला कर्मचाऱ्यांना सक्षम करणे गरजेचे आहेत. त्यामुळे प्रत्येक शहरात आणि जिल्ह्यात स्वतंत्र महिला पोलीस ठाण्याच्या निर्मितीची गरज भासत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि शहरात महिलांसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्य सरकारांना दिला होता. तामिळनाडू, उत्तरप्रदेश, राजस्थान, बिहार या राज्यासह तब्बल २५ राज्यात स्वतंत्र महिला पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली. महाराष्ट्र सरकारने केंद्र शासनाच्या निर्देशानुसार दखल घेत राज्यातील स्वतंत्र महिला पोलीस ठाणे नाशिक, नागपूर, मुंबई आणि पुणे शहरात सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.

हेही वाचा…नागपूर : शेकोटी पेटवल्यामुळे घराला आग, दोन भावडांचा होरपळून मृत्यू

नागपूर, नाशिक या दोन्ही पोलीस आयुक्तांनी गृहमंत्रालयाकडे स्वतंत्र महिला पोलीस ठाण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. मात्र, गृहमंत्रालयात स्वतंत्र महिला पोलीस ठाण्याचा प्रस्ताव अजुनही धूळ खात पडला आहे. अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र राज्य अगदी शेवटच्या स्थानावर आहे.

अशी आहे महिला ठाण्याची संरचना

शहरातील अन्य पोलीस ठाण्याप्रमाणेच स्वतंत्र महिला पोलीस ठाण्यांची संरचना असणार आहे. शहरातील अन्य पोलीस ठाण्यांत येणाऱ्या महिलांसंदर्भात सर्व तक्रारी या पोलीस ठाण्यात वर्ग केल्या जातील. पोलीस ठाण्यात महिला पोलीस निरीक्षकांसह ठाणे अंमलदार, बीट मार्शल, वाहन चालक, गुन्हे शोध पथक आणि पोलीस ठाण्यातील आस्थापनावरील सर्व कामकाज महिला कर्मचाऱ्यांकडे सोपवले जाईल.

हेही वाचा…चंद्रपूर : महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेतील ‘प्रशासक राज’ आमदारांसाठी डोकेदुखी!

यवतमाळातील लोहाऱ्यात महिला ठाणे

यवतमाळ जिल्ह्यातील लोहारा शहरातील पोलीस ठाण्याची धुरा महिला पोलीस अधिकारी आणि महिला कर्मचाऱ्यांच्या हातात देण्यात आली. अमरावतील परिक्षेत्राचे तत्कालीन पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मिणा यांनी हा यशस्वी प्रयोग केला होता. तसेच पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि नाशिकचे तत्कालीन पोलीस आयुक्त डॉ. सिंगल यांनी महिला ठाणे निर्मितीची पूर्ण तयारी केली असून गृहमंत्रालयाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेअभावी घोडे अडले आहे.