नागपूर : शालेय सुट्ट्या हा विद्यार्थ्यांसह शिक्षकांसाठीही फार महत्वाचा विषय असतो. शाळा सुरू व्हायला अजून विलंब असला तरी पुढील शैक्षणिक वर्षाच्या सुट्ट्या जाहीर झाला आहेत. २०२४-२५ मध्ये सार्वजनिक सुट्ट्या ७६ दिवसांच्या तर वर्षातील रविवार, असे मिळून यंदा १२४ दिवस शाळा बंद राहणार आहेत. दिवाळीच्या सुट्ट्या १२ दिवसांच्या असणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्हा परिषदेच्या शाळांची वेळ सकाळी साडेदहा ते पाच वाजेपर्यंत भरतील. अर्ध्या दिवसाच्या शाळेची वेळ सकाळी नऊ ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत असणार आहे. शाळेच्या कामकाज दिवशी ६० मिनिटांची मोठी सुट्टी तर पहिल्या व दुसऱ्या सत्रात दहा मिनिटांच्या दोन लहान सुट्ट्या असतील. प्राथमिक शाळा सतत तीन दिवस बंद राहणार नाहीत, याची दक्षता मुख्याध्यापकांनी (गावची यात्रा असा अपवाद वगळता) घ्यायची आहे. यादीतील सुट्ट्या सोडून इतर दिवशी थोर महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी असल्यास त्या दिवशी शाळा भरवून विविध स्पर्धांचे आयोजन करावे. २६ नोव्हेंबर रोजी शाळेत संविधान दिन साजरा करावा, असेही स्पष्ट केले आहे.

हेही वाचा…वर्धा : पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा; दोन महिन्यानंतर…

‘या’ दिवशी असणार सार्वजनिक सुट्टी

१७ जून (बकरी ईद), २१ जून (वटपौर्णिमा), १७ जुलै (मोहरम, आषाढी एकादशी), १५ ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन- पारशी नववर्ष), १९ ऑगस्ट (रक्षाबंधन), २ सप्टेंबर (पोळा), ७ सप्टेंबर (गणेश चतुर्थी), ११ सप्टेंबर (गौरीपूजन), १६ सप्टेंबर (ईद ए मिलाद), १७ सप्टेंबर (अनंत चतुर्दशी), २ ऑक्टोबर (महात्मा गांधी जयंती), ३ ऑक्टोबर (घटस्थापना), १२ ऑक्टोबर (दसरा), २८ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर (दीपावली सुटी), १५ नोव्हेंबर (गुरूनानक जयंती), २५ डिसेंबर (ख्रिसमस, नाताळ), १४ जानेवारी (मकर संक्रांती), २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन), १९ फेब्रुवारी (छत्रपती शिवाजी महाराज जयंती), २६ फेब्रुवारी (महाशिवरात्री), १४ मार्च (धूलिवंदन), १९ मार्च (रंगपंचमी), ३० मार्च (गुढीपाडवा, रमझान ईद), ६ एप्रिल (रामनवमी), १० एप्रिल (महावीर जयंती), १४ एप्रिल (डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती), १८ एप्रिल (गुडफ्रायडे), १ मे (महाराष्ट्र दिन), २ मे ते १४ जून (उन्हाळा सुटी).

हेही वाचा…यवतमाळ : नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांच्या ‘या’ मागणीने कुणबी, ओबीसी समाज नाराज

मुख्याध्यापकाच्या अधिकारात अन्‌ गावच्या यात्रेचीही सुट्टी

मुख्याध्यापकाच्या अधिकारात एक सुट्टी दिली जाते तर गावची स्थानिक यात्रा असेल, त्या दिवशी देखील एक सार्वजनिक सुटी दिली जाते. यंदाच्या शैक्षणिक वर्षातील सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये या दोन सुट्ट्यांचाही समावेश आहे. मुख्याध्यापक अधिकारातील सुट्टी घेण्यापूर्वी संबंधित मुख्याध्यापकांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे तीन दिवस अगोदर लेखी कळविणे अपेक्षित आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra state schools to have 124 holidays in 2024 2025 education year including 12 days for diwali dag 87 psg