देवेश गोंडाणे, लोकसत्ता

नागपूर : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या वतीने राज्यात सुरू असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. सहा महिन्यांपासून रखडलेला निर्वाह भत्ता, शाळा, महाविद्यालय सुरू होऊनही साहित्य न मिळणे, करोनाकाळातील १९ महिन्यांचा निर्वाह भत्ता न देणे अशा समस्यांमुळे विद्यार्थी आर्थिक संकटात सापडले आहेत.

School Girl Uniform
संतापजनक! मुख्याध्यापकाने ८० मुलींना शर्ट काढायला लावले; दहावीच्या विद्यार्थीनींनी ‘पेन डे’ साजरा केल्याची शिक्षा
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Image Of Student
सर्वोच्च न्यायालयाचा ‘JEE’बाबत मोठा निर्णय, केवळ ‘या’ विद्यार्थ्यांनाच तीन वेळा देता येणार परीक्षा
Akola Municipal Corporation Election news in marathi
अकोला महापालिकेतील ‘प्रशासक राज’ केव्हा संपणार?; संभाव्य निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी, वर्चस्व राखण्याचे भाजपपुढे आव्हान
Financial fraud , students , educational institution,
ठाण्यात शैक्षणिक संस्थेकडून २०० हून अधिक विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक
Why is the establishment of the Higher Education Commission delayed print exp
उच्च शिक्षण आयोगाचे काय झाले? स्थापनेस विलंब का?
Ramdas Athawale, Ramdas Athawale unhappy with BJP,
“काँग्रेसने सात विधानपरिषदेच्या जागा दिल्या होत्या परंतु, भाजपसोबत बारा वर्षांपासून युती करूनही…”, केंद्रीय मंत्र्यांचे विधान चर्चेत
Pune Traffic, Pune Encroachment , Muralidhar Mohol,
पुणे : प्रशासन ऐकत नसल्याने भाजपचे मंत्री झाले हतबल ! म्हणाले…

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राज्यात मुला-मुलींची ४४५ वसतिगृहे चालवली जातात ज्यामध्ये पन्नास हजारांवर विद्यार्थी शिक्षण घेतात. या विभागाकडून वसतिगृहांमध्ये दर्जेदार सुविधा पुरवण्याचा दावा केला जात असला तरी वास्तविकता मात्र भिन्न असल्याचे चित्र आहे. करोनाकाळामध्ये सामाजिक न्याय विभागाची सर्व वसतिगृहे बंद होती. यादरम्यान शाळा, महाविद्यालयेही बंद असली तरी ऑनलाइन शिक्षण सुरू होते. परिणामी, वसतिगृहातील विद्यार्थ्यांना बाहेर भाडय़ाची खोली करून राहण्याशिवाय पर्याय नव्हता. वसतिगृहातील बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असतात. गावांमध्ये इंटरनेटची जोडणी नसल्याने ऑनलाइन शिक्षण घेणे कठीण होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शहराच्या ठिकाणी भाडय़ाची खोली करावी लागली. मात्र, या काळात केवळ वसतिगृह बंद असल्याचा निकष लावून सामाजिक न्याय विभागाने या काळातील १९ महिन्यांचा निर्वाह भत्ता आणि शैक्षणिक साहित्याचा खर्चही विद्यार्थ्यांना देण्यास नकार दिला आहे.

दोन योजनांमध्ये भेद

वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना बाहेर भाडय़ाच्या खोलीत राहून शिक्षण पूर्ण करता यावे म्हणून स्वाधार योजना आहे. करोनाकाळात स्वाधार योजनेच्या लाभार्थीना सर्व लाभ देण्यात आले. मात्र, वसतिगृहामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना करोनाकाळात केवळ वसतिगृह बंद असल्याचे कारण देत त्यांना शैक्षणिक साहित्य आणि निर्वाह भत्त्यापासून वंचित ठेवले जात असल्याने समान तत्त्वावर सुरू असलेल्या दोन योजनांच्या लाभार्थीमध्ये शासन भेद करत असल्याचा आरोप विद्यार्थी खेमराज मेंढे यांनी केला आहे.

वसतिगृह विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी असले तरी शासनाच्या दुर्लक्षामुळे त्यांना अडचणींचाच सामना अधिक करावा लागतो. करोनाकाळात स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला. त्याच धर्तीवर वसतिगृहातील शैक्षणिक साहित्य खर्च व निर्वाह भत्ता देण्यात यावा.

उमेश कोर्राम, अध्यक्ष, स्टुडंट राइट्स असो. ऑफ इंडिया

हा विषय शासनाकडे चर्चेला आहे. याशिवाय निर्वाह भत्ता आणि शैक्षणिक साहित्याचा खर्च निधीअभावी रखडला. तो प्रश्न त्वरित सोडवला जाईल.

डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग

Story img Loader