वर्धा: जिल्ह्यातील चारही मतदारसंघात काँग्रेस पराभूत झाली आहे. मयुरा अमर काळे, शेखर शेंडे, रणजित कांबळे हे वारसदार तर वारसा नसलेले युवा उमेदवार अतुल वांदिले असे चौघेही घरी बसले आहे. मयुरा अमर काळे यांचा पराभव तर घराणेशाहीचे उबग आणणारे उदाहरण ठरले होते. त्याचे बेधडक समर्थन करणारे खासदार अमर काळे हे दिवं. माजी मंत्री शरद काळे यांचे चिरंजीव. सुप्रिया सुळे सांगून गेल्या की मयुरा माझ्या नात्यात तर राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचे अमर काळे यांचे मामा. त्याच नात्याचा दबाव आणत तिकीट आणायची व मतदारांना भावनिक साद घालायची, असे राजकारण आर्वीतून मतदारांनी नापसंद  केले आहे.

देवळीत माजी मंत्री दिवं. प्रभा राव यांचे भाचे असलेले रणजित कांबळे हे दरवेळी निवडून येतातच कसे, असा राजकीय वर्तुळस नेहमी पडणारा प्रश्न. अरेरावी व उद्दामपणा  याचे प्रतीक म्हणून कांबळे यांच्यावर टीका व्हायची. ती खऱी असल्याचे मतदार सांगते झाले आहे. वर्ध्यात शेखर शेंडे हे माजी मंत्री दिवं. विधानसभा उपाध्यक्ष प्रमोदबाबू शेंडे यांचे सुपुत्र. राजकीय वारसा त्यांनी मिळविला. पण चौथ्यांदा यशाने पाठ फिरविली. त्यांचे आजोबा भाऊसाहेब शेंडे हे पण आमदार राहून चुकले. परिघातील तेली समाजाचं नेतृत्व त्यांच्याकडे. मात्र अधिकचे सर्व सामाजिक संबंध पण त्यांनी जुळविले. पण हे नकोच, असा निरोप मतदारांनी त्यांना दिला आहे. 

Congress List for delhi assembly Election
Delhi Election : आता दिल्ली विधानसभेची धूम! काँग्रेसने जाहीर केली २१ उमेदवारांची यादी, अरविंद केजरीवालांसमोर तगडा उमेदवार!
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Rahul Gandhi And Arvind Kejriwal.
Delhi Election 2025 : काँग्रेसला हवी ‘आप’ची साथ, ‘हात’ मिळवण्यास केजरीवालांचा नकार
देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं? बावनकुळे म्हणाले... (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं?
one nation one election
मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाची ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी
महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का?
Sudhir Mungantiwar On Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? महत्त्वाची माहिती समोर
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक

हेही वाचा >>> Gadchiroli Election Result 2024 : धर्मरावबाबांनी अहेरीचा गड राखला, गडचिरोलीत भाजपचे वर्चस्व; आरमोरीत काँग्रेसची मुसंडी

लोकसभा निवडणुकीत अमर काळे यांना आघाडीने उमेदवार म्हणून पसंती दिली. लाटेत ते निवडून आलेही. पण पुढील काळात व आता निवडणुकीत त्यांना पत्नीसाठीच राजकीय धावाधाव करावी लागल्याने आघाडीच्या एकाही उमेदवारासाठी  ते प्रचार करू शकले नाही. आता मतदारांनी त्यांना पुढे कुटुंबासाठीच वेळ देण्याचा सल्ला मतदानतून देऊन टाकला. तीन राजकीय घराण्यापुढे आता पुढे काय, हा प्रश्न मतदारांनी निर्माण करून ठेवला आहे. भाजपचे चारही विजयी उमेदवार हे  राजकीय वारसा शून्य असलेले तर काँग्रेसचे तीन दमदार राजकीय वारसा सांगणारे. जिल्ह्याच्या पुढील राजकारणात काँग्रेसला सूचक संदेश देणारे हे मतदान ठरले असल्याची चर्चा सूरू झाली आहे.

Story img Loader