नागपूर : जिल्ह्यातील इतर मतदारसंघाप्रमाणे दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातही मतांची टक्केवारी वाढली आहे. पुरुषांपेक्षा अधिक महिला असलेल्या या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीपेक्षा यावेळी १४ हजारांहून अधिक महिलांनी मतदान केले. ही वाढलेली मते कोणाच्या पारड्यात जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत झाली. या प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी स्थानिक मुद्यांसोबत हिंदुत्व आणि संविधान हे मुद्दे प्रचारात आणले होते. परंतु सर्वाधिक चर्चा संविधान बचाव, बेरोजगारी विरुद्ध कडवट हिंदू या मुद्दयांवर झाली. तसेच भाजपकडून लाडकी बहीण योजनेचा प्रचार करण्यात आला. त्या भरवशावर भाजपला पुन्हा संधी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे तर काँग्रेसने संविधानावरील हल्ला रोखण्यासाठी भाजपला धडा शिकवण्याचे आवाहन केले होते. सोबतच मानेवाडा, हुडकेश्वर, पिंपळा, बाबुळखेडा या भागातील आरक्षित भूखंडाचे प्रश्न सोडवण्यात न आल्याचा मुद्दा प्रकर्षाने मांडण्यात आला. दुसरीकडे भाजपने प्रखर हिंदुत्वाचा मुद्दा एका स्थानिक संघटनेच्या माध्यमातून उचलून धरला. हे मुद्दे जरी दोन्ही पक्षाकडून प्रचारात आणले गेले तरी उमेदवारांची प्रतिमा आणि वैयक्तिक जनसंपर्क यावर उमेदवारांनी कौल दिल्याचे सांगण्यात येत आहे. सोबतच महिला मतांची टक्केवारी वाढल्याने लाडकी बहीण योजनेचा प्रभाव असल्याचा दावा भाजप करत आहे.

Youth Congress, officials expelled, Nagpur,
नागपूर : युवक काँग्रेसमध्ये काय चाललंय? आणखी चार पदाधिकारी निष्कासित
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Ignoring voter growth led to Assembly elections defeat Vishal Patil admits
मतदार वाढीकडे केलेले दुर्लक्ष विधानसभा निवडणुकीत भोवले; विशाल पाटील यांची कबुली
Increase in ST fares after elections are over is fraud with poor people Vijay Vadettiwar criticizes
निवडणूक होताच एसटीची दरवाढ, ही गरीब जनतेची लूट; विजय वडेट्टीवार यांची टीका
More than 17 deaths in two years at ammunition company
दारुगोळा कंपनीत दोन वर्षांत १७ हून अधिक बळी… भंडारातील घटनेमुळे…
hane rural areas thane district residents homes Central and State government Gharkul scheme
ग्रामीण भागातील १५ हजारहून अधिक रहिवाशांना मिळाले स्वप्नातले घर, केंद्र आणि राज्य पुरस्कृत घरकूल योजना प्रगतीपथावर
Farmers of Yavatmal district support Shaktipeeth highway
शक्तिपीठ महामार्गाला यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे समर्थन; भूसंपादन प्रक्रिया तत्काळ…
What exactly is the case of hair loss in Buldhana district
लहान मुले आणि महिलांनाही टक्कल… बुलढाणा जिल्ह्यातील केसगळतीचे प्रकरण नेमके काय? कारण आणि उपायांबाबत अद्याप अनिश्चितता का?

हेही वाचा – पूर्व नागपूरचा निकाल बंडखोरच ठरवणार

मुळातच या मतदारसंघात पुरुषांपेक्षा महिला अधिक आहेत. त्यामुळे महिला मतदारांची संख्या वाढली असून त्यांनी गुन्हेगारीमुक्त दक्षिण नागपूरच्या मुद्यावर मतदान केल्याचा दावा काँग्रेस करत आहे. या भागात मुस्लीम समाजाच्या काही वस्त्या आहेत. तेथील मतदान भाजपला मिळणार नसल्याने मतदारांची अडवूक करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला. येथे सुमारे ८ टक्के मुस्लीम समाजातील मतदार आहेत. तसेच काँग्रेसने अनुसूचित जातीचे १९ ते २० टक्के मतदारांचे गणित मांडले आहे. भाजपने मतांच्या ध्रुवीकरणावर अधिक भर दिल्याचे दिसून आले.

हेही वाचा – मध्य नागपूरमध्ये ३४ हजार वाढीव मतांवरच विजयाचे गणित

२ लाख ६३५ महिला मतदार

या मतदारसंघात एकूण ३ लाख ९४ हजार ४२५ मतदार आहेत. त्यापैकी १ लाख ९३ हजार ७८२ पुरुष तर २ लाख ६३५ महिला मतदार आहेत. त्यापैकी १ लाख १२ हजार १३५ पुरुषांनी आणि १ लाख १२ हजार १३५ महिलांना मतदान केले. विधानसभेत २ दोन लाख २४ हजार ७९३ मतदारांनी मतदान केले. ५६.९९ टक्के मतदान झाले. मागील निवडणुकीत ५१.५ टक्के मतदान झाले होते. याचाच अर्थ साडेपाच टक्के मतदान अधिक झाले.

Story img Loader