नागपूर : धर्माचा वापर करून शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस वोट जिहाद करत असून हे खेदजनक आहे. निवडणुकीच्या काळात इतके लांगुलचालन यापूर्वी कधी बघितले नव्हते. अल्पसंख्याक मते मिळवण्यासाठी महाविकास आघाडी काम करत असेल तर त्याविरुद्ध सगळ्यांना एक व्हावे लागणार असल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
देवेंद्र फडणवीस नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. उलेमा कौन्सिलने महाविकास आघाडीला १७ मागणीचे पत्र दिले आहे. या मागण्या इतक्या भयानक आहे की त्यात दहा टक्के आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवाय देशावर व राज्यात जे दंगे भडकविण्यात आले होते अशा दंग्यातील जे मुस्लिम आरोपी आहे त्यांच्यावरील केसेस परत घ्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घाला अशी मागणी त्यात करण्यात आली आहे्. महाविकास आघाडीला उलेमा बोर्डाने दिलेल्या मागण्या महाविकास आघाडीने त्या मान्य केल्यानंतर उलेमा बोडार्ने त्यांना पाठिंबा दिला आहे. मुस्लिमांची मते मिळावी यासाठी महाविकास आघाडी कुठल्या स्तरावर जाऊ शकतात. देशावर दहशतवादी हल्ले करणाऱ्यांना तुरुंगातून सोडण्याची मागणी केल्यानंतर ती सुद्धा काँग्रेसने मान्य केली आहे. म्हणजे प्रकारे दहशतवादी कृत्याला कांग्रेसचे समर्थन आहे. महाविकास आघाडीचे व्होट जिहाद सुरू केल आहे त्यामुळे राज्यातील जनतेने सावध राहून मतदान करण्याची वेळ आली आहे. सर्वाना एक व्हावे लागेल तरच देश सुरक्षित राहील असेही फडणवीस म्हणाले.
हेही वाचा : अमित शहांच्या गडचिरोली दौऱ्याआधी भामरागडमध्ये बॉम्बस्फोट, सुदैवाने…
यापेक्षा भयानक नोमानीचा दुसरा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. त्यात काही लोकांनी लोकसभेत मुस्लिम समाजातील ज्या व्यक्तीने भाजपला मतदान केले आहे त्यांना शोधून काढा आणि त्यांचा दाणापाणी बंद करा, सामाजिक बंदी घाला असे सांगितले आहे. स्वतःला सेक्युलर म्हणून घेणारे महाविकास आघाडीचे लोक यावर एक शब्द बोलत नाही. एका धर्माला हाताशी धरुन ज्या पद्धतीने महाविकास आघाडी राजकारण करत आहे. त्याला निश्चितपणे आम्ही उत्तर देऊ असेही फडणवीस म्हणाले. मुस्लिम समाजाला धमकावणे म्हणजे म्हणजे एक प्रकारचा गुन्हा आहे. किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक राहावे लागेल, एक आहे ते सेफ आहे अशी घोषणा केली तीयोग्य आहे. आज महाविकास आघाडीसह काँग्रेस जाती-जातीत विभाजित करण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीने काँग्रेस मुस्लिम समाजाला जवळ करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत असल्याचे फडणवीस म्हणाले. महाविकास आघाडीकडे दुसरा मुद्दा नाही ते विकासावर बोलत नाही. त्यांच्याकडे रोडमॅप नाही. फक्त जातिवाद करून निवडणूक जिंकणे हे एकच ध्येय असल्याचे फडणवीस म्हणाले.