अकोला : जिल्ह्यातील विधानसभेच्या पाच मतदारसंघातील निवडणुकीच्या रिंगणात एकूण १११ उमेदवार असून त्यांच्या भाग्याचा फैसला १६ लाखांवर मतदारांच्या हातात आहे. मतदानासाठी यंत्रणा सज्ज आहे. १७४१ केंद्रांवर २० नोव्हेंबरला सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

विधानसभा निवडणुकीसाठी अकोला पूर्व २१, अकोला पश्चिम २२, अकोट १९, बाळापूर २९ व मूर्तिजापूर मतदारसंघात २० असे एकूण १११ उमेदवार नशीब आजमावत आहेत. जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांमध्ये एकूण १६ लाख ३७ हजार ८९४ मतदार आहेत. मतदानासाठी १७४१ मतदान केंद्रांवर २२८० मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी म्हणून ६८४४ असे एकूण ९१२४ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान केंद्रावरील वाहतुकीसाठी १२१ एसटी बस, मिनी बस ५१, जीप ३४ व क्षेत्रिय अधिकाऱ्यांच्या व्यवस्थेसाठी २३३ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.

Nagpur Bharosa Cell , Nagpur , Bharosa Cell,
नागपूर : विस्कटलेल्या १६ हजार ८४३ कुटुंबियांना पोलिसांचा ‘भरोसा’
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Scheduled Caste students scholarships,
अकोला : अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती धोक्यात: महाविद्यालयांची टाळाटाळ अन्…
Samsaptak RajYog in kundli
आता नुसता पैसा! सूर्य-मंगळ निर्माण करणार समसप्तक राजयोग; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना होणार आकस्मिक धनलाभ
305 winners of mhadas 2016 postal lottery finally received their houses
३०५ विजेत्यांची आठ वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात, पत्राचाळ योजनेतील घरांना निवासी दाखला
Happy Makar Sankranti 2025 Wishes Messages in Marathi
Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा मराठी भाषेतून खास गोड शुभेच्छा अन् Greeting cards; पाहा यादी
scheme for unemployed youth promises rs 8500 per month
सत्तेत आल्यास सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा ८५०० रुपये : काँग्रेस
Image of a lottery ticket
स्वप्नात दिसलेल्या नंबरचे लॉटरी तिकिट घेतले अन् महिला जिंकली ४२ लाख रुपये; पती म्हणाला, “मला काही हे…”

हेही वाचा >>> Anil Deshmukh Attack: काँग्रेसच्या उमेदवाराने देशमुखांवर हल्ला केला, भाजप नेत्याचा अजब दावा

मतदान प्रक्रियेत नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी १० हजार २०२ टपाली मतपत्रिकांचे वितरण केले. ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व व ८५ वर्षांच्यावरील मतदानांसाठी गृहमतदानाची सुविधा होती. त्यामध्ये अर्ज केलेल्या २९१५ मतदारांपैकी २७३७ जणांना आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. गृहमतदानाची टक्केवारी ९३.८९ टक्के आहे. मतदारसंघनिहाय क्षेत्रिय अधिकारी नियुक्‍त करण्‍यात आले असून त्‍यांना कार्यकारी दंडाधिकारी यांचे अधिकार प्रदान केले. क्षेत्रिय अधिकारी यांना मतदान केंद्रे नेमून दिले आहेत. मतदान केंद्रांवर कुठल्‍याही प्रकारची अडचण उद्भवल्‍यास त्‍याचे निराकरण करण्‍याचे प्रशिक्षण त्‍यांना देण्‍यात आले आहे. जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांमध्ये १५३ क्षेत्रिय अधिकारी कार्यरत राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा >>> Anil Deshmukh Attack: अनिल देशमुखांच्या हल्यामागे ‘या’ भाजप नेत्याचा हात… प्रवीण कुंटे पाटीलांनी थेट नावच घेतले..

३७४९ जवानांकडून चोख सुरक्षा व्यवस्था

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीतील मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक निरीक्षक (पोलीस) यांच्या मार्गदर्शनात जिल्‍हा पोलीस अधीक्षकांकडून पोलीस बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला आहे. जिल्ह्यातील सुरक्षा व्यवस्थेत १३९९ पोलीस, १३८६ होमगार्ड, सीएपीएफचे ८०० जवान, एसआरपीएफचे १६४ जवान असे एकूण ३७४९ जण कार्यरत राहतील. 

९५.३१ टक्के चिठ्ठ्यांचे वाटप

मतदार यादीमध्‍ये नाव समाविष्‍ट मतदारांना यादीतील तपशील तसेच केंद्रांची आवश्‍यक माहिती मिळण्यासाठी घरोघरी जाऊन चिठ्ठीचे वितरण केले. मतदानाचे वेळी सदर मतदार माहिती चिठ्ठी दाखवून मतदारांना आपला मतदानाचा हक्‍क बजावता येईल. जिल्ह्यात ९५.३१ टक्के चिठ्ठ्यांचे वितरण झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Story img Loader