अमरावती : पक्षशिस्त मोडल्याचा ठपका ठेवून जिल्ह्यातील भाजपच्या तीन बंडखोर उमेदवारांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही कारवाई केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता, माजी स्थायी समिती सभापती तसेच भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तुषार भारतीय आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोदसिंह गड्रेल यांना भाजपमधून निष्कासित करण्यात आल्याचे आदेश धडकले आहेत.
अमरावती मतदारसंघातून बंडखोरी करीत गुप्ता हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या उमेदवार सुलभा खोडके यांच्या विरोधात रिंगणात आहेत. भारतीय यांनी महायुतीचा घटक असलेल्या युवा स्वाभिमान पक्षाचे बडनेरा मतदारसंघाचे उमेदवार रवी राणा यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकवून उमेदवारी कायम ठेवली आहे, तर गड्रेल यांनी अचलपूर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार प्रवीण तायडे यांच्या विरोधात उमेदवारी दाखल केली आहे.
महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात निवडणूक लढण्याची कृती ही पक्षविरोधी असल्याचे सांगून भाजपने या बंडखोरांवर कारवाई केली आहे. पक्षाने राज्यातील एकूण ३७ जणांवर कारवाई केली आहे. आणखी काही जणांवर कारवाईची शक्ता वर्तवली आहे.
हेही वाचा >>> वर्धा जिल्ह्यात थेट लढत, उमेदवारांची कसोटी
गुप्ता हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी निवडणूक लढण्याची आधीपासूनच तयारी केली होती. अमरावती मतदारसंघातून उमेदवारी मिळेल, अशी त्यांना अपेक्षा होती. पण अमरावतीची जागा महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला सुटल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला. प्रखर हिंदुत्वाचा मुद्दा समोर करीत गुप्ता यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे.
हेही वाचा >>> वर्धा : वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात राडा; भाजप नेत्यांना धक्काबुक्की, पोलीस ठाण्यात शेकडोंचा जमाव
भारतीय यांनी देखील गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुकीची तयारी केली होती. बडनेरा मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या आमदार रवी राणा यांनी लगेच भाजपला पाठिंबा दिला होता. त्याची परतफेड भाजपने केली आणि त्यांना या निवडणुकीत पाठिंबा दिला. राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष हा महायुतीचा घटक आहे. राणांना भाजपने पाठिंबा दिल्याने भारतीय यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला. अचलपुरातून तायडे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर जाहीर नाराजी व्यक्त करून भाजपच्या सात प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बंड पुकारण्याचा इशारा दिला होता. त्यापैकी प्रमोदसिंह गड्रेल, अक्षरा लहाने, नंदकिशोर वासनकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बंडखोरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अखेर अक्षरा लहाने आणि नंदकिशोर वासनकर यांनी माघार घेतली, पण प्रमोदसिंह गड्रेल हे बंडखोरीच्या निर्णयावर ठाम राहिले.