वर्धा : जिल्ह्यातील प्रचारतोफा आज शांत झाल्या. मुदत पाळून व तक्रार होवू नये याची काळजी घेत सर्वच उमेदवारांनी आपले प्रचाराचे चंगुबगाळे आवरले. मात्र त्याचवेळी मतदान प्रक्रिया पण सूरू होती. अर्थात ही टपाली मतदान व्यवस्था होती. त्यात सर्वप्रथम जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी हा हक्क बजावला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ते मूळचे सांगली जिल्ह्यातील.त्यांचे नाव अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघत आहे. पण मतदान नोंदणीत नागपूर विभागात अव्वल ठरणाऱ्या व शासकीय पुरस्कार पटकविणाऱ्या वर्धा जिल्ह्याचे कलेक्टर असणाऱ्या कर्डीले यांनी टपाली मतदान करीत तसे चित्र माध्यमावर टाकले आहे. ड्युटीवर असलेल्या आपल्या सहकारी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांनी मतदान नोंदविण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा >>> फडणवीस म्हणाले, ‘ मुलींनो; तुमचा मामा मंत्रालयात बसला आहे, चिंता नको… ‘
मतदानाच्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या. जिल्ह्यातील चारही मतदारसंघात ११ लाख २८ हजार ३९२ मतदार आपला हक्क बजावतील. जिल्ह्यात मतदान केंद्रावर ३ हजार ४६ मत युनिट, १ हजार ७०४ कंट्रोल युनिट व १ हजार ८३९ व्हीव्हीपॅट उपलब्ध करून देण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. मतदान केंद्रावर मोबाईल, कॅमेरा वापरण्यास मनाई करण्यात आली असून तसे केल्यास गुन्हा दखल होणार. तसेच यंत्रनेचा फोटो काढल्यास कारवाई होईल, असा ईशारा पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी आज दिला.
हेही वाचा >>> उमरेडमध्ये तरुणीचा बलात्कार करुन खून, मृतदेह आढळल्याने खळबळ
चारही मतदारसंघात सुरक्षित मतदान होईल यांची दक्षता घेण्यात आली आहे. सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एकूण मतदारात ५ लाख ६९ हजार ५९८ पुरुष व ५ लाख ५८ हजार ७८१ महिला मतदार तसेच १३ तृतीयपंथी मतदार आहेत. दिव्यांग मतदार संख्या ८ हजार ८६१ असून ८० वर्षावरील मतदार ३५ हजार ५१ एव्हडी आहे. सर्व्हिस मतदार ८७९ अशी संख्या आहे.१ हजार ३४६ मतदान केंद्र सज्ज असल्याचे जिल्हा निवडणूक कार्यालयाने नमूद केले आहे. राजकीय पक्षांनी निवडणूक बूथ कुठे उभारावे, तिथे कशी व्यवस्था असावी, त्या ठिकाणी बॅनर, बैठक, गर्दी व्यवस्थापन याबाबत निर्बंध जाहिर करण्यात आले आहे. मतदान केंद्राजवळ शस्त्र बाळगणे किंवा त्याचे प्रदर्शन करने प्रतिबंधित आहे. केंद्रीय राखीव दल तसेच स्थानिक पोलीस निगराणी ठेवतील. मोबाईल वापरल्याने लोकसभा निवडणुकीत चार गुन्हे दाखल करण्यात आले होते, याचे स्मरण पण निवडणूक कार्यालयाने करून दिले आहे.