वर्धा : सेना, भाजप व अजित पवार विरुद्ध शिवसेना उध्दव ठाकरे , काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष  असे तीन पक्षाचे तीन  उमेदवार विधानसभा निवडणूक मैदानात उतरले. तिघांची एकमेकांची मैत्री ही जागा वाटप करतांना कसोटीला लागली होती. वाद विवाद झाले. एक एक जागेचा वाद रंगला. शेवटी मिळून संसार करायचा म्हणून एकत्रित आले व जागा जाहीर झाल्या.

पण आता मतदानास दोन दिवस बाकी असतांनाच परत मैत्रीत खडा पडत  आहे. त्याचे कारण मतदान केंद्रावरील बूथ लावण्याबाबत. प्रत्येक पक्ष हे मतदान नियोजन करतांना आपल्या कार्यकर्त्यावर जबाबदारी टाकत असतात. मात्र त्याचे वाटप कसे करायचे, हा प्रश्न उभा झाला आहे. कारण समजा भाजप उमेदवार असेल तर त्यास स्वपक्षाच्या  कार्यकर्त्यासोबतच मित्र पक्ष असलेल्या शिंदे व अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यास पण सांभाळून घ्यावे लागते. काँग्रेस उमेदवार असेल तर त्यास मित्रपक्ष शरद पवार राष्ट्रवादी व ठाकरे सेनेस सांभाळणे आलेच. बूथ लावण्यात उत्साह म्हणजे त्या त्या प्रभागात माझे वर्चस्व आहे हे दाखविणे व दुसरी बाब म्हणजे पुढील पालिका निवडणुकीत उमेदवारी मागतांना या कामावर दावा करण्याची दृष्टी. शिवाय बुथ दिवसभर चालविण्यासाठी  मिळणारे पैसे. ५ ते १० हजार रुपये प्रत्येक बूथसाठी उमेदवार देत असल्याचे सांगितल्या जाते. त्यासाठी आता काही मतदारसंघात वादावादी  सूरू झाल्याचे ऐकायला मिळत आहे.

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
evm scam india alliance
ईव्हीएमचा वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात! ‘इंडिया’आघाडी याचिका दाखल करण्याची शक्यता
Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : ‘मविआ’ला धक्का बसणार? “अनेकजण शिवसेना, भाजपाच्या संपर्कात”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
Maharashtra Legislative Council Chairman post,
विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?
Ratnagiri assembly defeat , Shivsena Thackeray Ratnagiri , Ratnagiri latest news, Ratnagiri shivsena news,
रत्नागिरी विधानसभेचा पराभवाचा वाद देवाच्या दारात, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गद्दारांना शिक्षा देण्यासाठी घातले गाऱ्हाणे
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
BJP leader and MLA Rahul Narvekar elected unopposed as the Speaker of the Legislative Assembly
Rahul Narwekar : नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी फेरनिवड; मंत्रीपदाचे स्वप्न भंगले

हेही वाचा >>>भाजप-काँग्रेस समर्थक भिडले, ग्रामस्थांकडून काँग्रेस उमेदवाराच्या समर्थकांना चोप

लोकसभा निवडणुकीत तर वर्धा शहरात दोन बड्या नेत्यातच बूथ घेण्याबाबत वाद झाले होते. बुथची पळवापळवी  आता सूरू झाली आहे. स्वपक्षाच्या कार्यकर्त्यास किती व मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यास कोणत्या भागात बुथ द्यायचे हेच काम आज पक्ष कार्यालयात सूरू आहे. आवडीचे बूथ देता नं आल्यास मग अशा कार्यकर्त्यास विशेष पॅकेज देत सांभाळून घेतल्या जात आहे. एक उमेदवार म्हणाला की आमच्या  मित्रपक्षाच्या एका नेत्याकडे कार्यकर्तेही नाही. तरीही तो बूथची संख्या सांगत  पैसे मागत आहे. त्याचेही समाधान करने आलेच, अशी गंमत या उमेदवाराने बूथ वाटप करण्याबाबत येणाऱ्या अडचणी सांगतांना नमूद केली. काही दमदार कार्यकर्ते  अधिक हुशार. मी काही कोणाचा शिक्का लावून घेत नाही. पालिका निवडणुकीत मला सर्वांचीच मते हवी असतात. दूरच राहलेले बरं. लोकसभा निवडणुकीत तर एका पक्षाच्या बूथ घेणाऱ्या कार्यकर्त्याने बूथ लावले पण पोरगा बसवून निधीसह तो पसार झाला. त्यामुळे स्वपक्षीय प्रामाणिक तसेच मित्रपक्षाचे पण बूथ वाटपात समाधान करण्याची खटपट दिसून येते.

Story img Loader