नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभा अध्यक्षांनी तालिका सभाध्यक्षांची नावे जाहीर केली. यातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला डावलण्यात आले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी चार तालिका सभाध्यक्षांची नावे जाहीर केली. हे अधिवेशन सहा दिवसांचे आहे. उर्वरित काळाचे कामकाज नियमित सुरू राहण्यासाठी तालिका सभाध्यक्षांची घोषणा केली. यात भाजपचे विजय रहांगडाले, शिवसेनेचे (शिंदे) रमेश बोरनारे, शिवसेना (ठाकरे) दिलीप सोपल, राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेस शेखर निकम यांचा समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू करा? भाजप आमदाराने अखेर…

रहांगडाले हे तिरोडा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून गेले आहेत. बोरनारे, निकम हे दुसऱ्यांदा निवडले गेले. दिलीप सोपल हे सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य आहेत. विद्यमान विधानसभेत भाजप-१३२, शिवसेना (शिंदे)- ५७, राष्ट्रवादी (अजित पवार)-४१ आणि शिंदे (ठाकरे)- २०, काँग्रेस-१६ आणि राष्ट्रवादी (शरद पवार)- १० असे संख्याबळ आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha winter session names of four table presidents announced congress ncp sharad pawar party neglected rbt 74 css