नागपूर : मान्सूनचा मूड काही वेगळाच असून यंदा पावसाने मात्र ‘सरीवर सरी’ असाच कार्यक्रम हाती घेतला की काय, अशी शंका येत आहे. मान्सूनच्या सुरुवातीला विदर्भाच्या काही भागातच कोसळणाऱ्या पावसाने आता मात्र चांगलाच वेग धरला आहे. संपूर्ण विदर्भ मान्सूनने कवेत घेतला असून अवघ्या दोन दिवसाची उसंत घेऊन तो पुन्हा परतला आहे. त्यामुळे या आठवड्याची अखेर आणि पुढील आठवड्याची सुरुवात पावसाळीच राहणार आहे हे निश्चित!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय हवामान खात्याने या आठवड्याच्या अखेर आणि पुढील आठवड्याच्या सुरुवातीचा पावसाचा कार्यक्रमच जाहीर केला आहे. विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, अकोला, वर्धा, वाशीम, यवमाळ, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ‘येलो अलर्ट’ हवामान खात्याने दिला आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर आणि जळगाव जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा ‘येलो अलर्ट’ हवामान विभागाने दिला. गुरुवारी हवामान खात्याने जाहीर केलेल्या पावसाच्या अंदाजानुसार कोकण विभाग तसेच मध्य महाराष्ट्रात पावसाचा खंड राहील, पण विदर्भात मात्र पावसापासून सुटका नाहीच.

हेही वाचा : Amol Mitkari: अमोल मिटकरी म्हणतात, “संजय राऊत दुतोंडी साप! ते लवकरच…”

विदर्भातील बहूतांश जिल्ह्यांमध्ये २२ ऑगस्टपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात मात्र फारसा पाऊस नाही. गेल्या आठवड्यासह या आठवड्याच्या सुरुवातीला देखील राज्याच्या काही भागात तापमानात बऱ्यापैकी वाढ झाली होती. विदर्भातील ब्रम्हपूरी, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास कमाल तापमानाची नोंद घेण्यात आली. आता पुन्हा एकदा विदर्भावर पावसाचे सावट आहे. गुरुवारी जाहीर केलेल्या पावसाच्या अंदाजानुसार २२ ऑगस्टपर्यंत तर विदर्भातील बहूतांशी जिल्ह्यात पाऊस कायम असणार आहे. तर २२ ऑगस्टनंतर कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, या काळात मराठवाड्यात पाऊस फारसा नसेल. २९ ऑगस्ट ते पाच सप्टेंबर या कालावधीत विदर्भ आणि उत्तर कोकणाचा काही भाग वगळता राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे.

हेही वाचा : ‘पोकेमॉन गो’च्या स्पर्धेत नागपूरचा तरुण…तब्बल वीस लाख डॉलर….

दरम्यान, गुरुवारी हवामानखात्याने वर्तवलेल्या अंदाजामुळे यंदाच्या रक्षाबंधणावर पावसाचे सावट असणार हे नक्की आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या उपराजधानीत ढगांच्या गडगडाटासह पाऊस दाखल झाला आहे. तर आताही शनिवार, रविवार आणि सोमवारी देखील विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra weather update imd yellow alert for heavy rainfall in vidarbh on rakshabandhan rgc 76 css