वर्धा : माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्री म्हणून साजरी केल्या जाते. इंग्रजी कॅलेंडरनुसार ती ८ मार्च रोजी येते. शिवपुराणानुसार या दिवशी महादेवाची विधीवत पूजा केल्याने तसेच व्रत ठेवल्याने विशेष फळ प्राप्त होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाशिवरात्रीला अशाप्रकारे करा महादेवाची पूजा – व्रत विधी

महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र झाल्यानंतर कपाळावर भस्माचा त्रिपुंड टिळा लावावा आणि गळ्यात रुद्राक्षाची माळ घालावी. त्यानंतर मंदिरात जाऊन महादेवाची पूजा करावी. त्यानंतर हातामध्ये फुल, अक्षता घेऊन शिवलिंगावर अर्पित करावे.

अशाप्रकारे महादेवाची रात्री करा पूजा

दिवभर शिव मंत्र (ओम नम: शिवाय)चा जप करून निराहार उपवास करावा. (रोगी, अशक्त आणि वृद्ध दिवस फलाहार) करू शकतात. शिवपुराणामध्ये रात्रीच्या चार प्रहरात शिव पूजा करण्याचे विधान आहे. संध्याकाळी स्नान करून महादेवाच्या मंदिरात जाऊन किंवा घरातच पूर्व किंवा उत्तर दिशेला मुख करून बसावे आणि खालील मंत्राचा उच्चार करून संकल्प घ्यावा.

हेही वाचा : तीन दिवसा आधीच होणार बँक कर्मचारी वेतनवाढीचा करार, काय आहे कारण?

महादेवाला फळ, फूल, चंदन, बिल्वपत्र, धोतरा अर्पण करून, धूप-दीप लावून रात्री चारही प्रहर पूजा करावी. जल आणि पंचामृताने शिवलिंगाला अभिषेक करावा. भव, शर्व, रुद्र, पशुपति, उग्र, महान, भीम आणि ईशान या नावांचा उच्चार करून फुल अर्पण करावे. त्यानंतर आरती करावी. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा स्नान करून महादेवाची पूजा करून व्रत सोडावे.

रात्रीच्या पूजेचे शुभ मुहूर्त

पहिल्या प्रहरातील पूजा – संध्याकाळी ०६:१८ ते ०९:२० पर्यंत
दुसऱ्या प्रहरातील पूजा- रात्री ०९:२० ते १२:४० पर्यंत
तिसऱ्या प्रहरातील पूजा – रात्री १२ :४० ते ०३:४५पर्यंत
चौथ्या प्रहरातील पूजा – रात्री ०३:४५ ते सकाळी ०६:५३ पर्यंत

हेही वाचा : संस्कृत ही २०४७पर्यंत पहिल्या पसंतीची भाषा व्हावी!

महाशिवरात्रीची कथा

गुरुद्रुह नावाचा एक भिल्ल शिकारीसाठी जंगलात गेलेला असतो. त्याला दिवसभर शिकार मिळत नाही. तो ज्या झाडावर बसलेला असतो ते बेलाचे झाड असते. त्याखाली महादेवाची एक पिंड असते, त्याच्यावर पालापाचोळा साचलेला असतो. शिकारीची वाट पाहता-पाहता शिकारी भूक-तहान विसरतो यामुळे त्याला उपवास घडतो. शिकार मिळत नाही या विचाराने तो त्या झाडाची पाने खाली टाकण्यास सुरुवात करतो. ती पाने खाली महादेवाच्या पिंडीवर पडतात आणि त्याला महाशिवरात्रीदिनी उपवास आणि बेलाची पाने महादेवाच्या पिंडीवर वाहण्याचे पुण्य मिळते. त्याची सारे दु:ख दूर होतात. भगवान शिवशंकर त्याच्यावर प्रसन्न होतात, अशी कथा महाशिवरात्रीचे महात्म्य स्पष्ट करताना सांगितली जाते.

हेही वाचा : लोकजागर: मोदी, शेती आणि यवतमाळ!

माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून साजरी केली जाते. यादिवशी शैव पंथीय भगवान शंकराची आराधना करतात. दुसर्‍या दिवशी व्रताची सांगता केली जाते. पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा भगवान शिवशंकरांनी रौद्र रूप धारण करत तांडव केले होते तीच ही रात्र म्हणजे कालरात्र किंवा महाशिवरात्र. दुसर्‍या एका आख्यायिकेनुसार भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह याच दिवशी झाल्याने या रात्री जागरण केल्याने पुण्यफळ मिळते. दिवसभर उपवास करून व्रत केल्याने भगवान शंकर प्रसन्न होत असल्याची मान्यता आहे. तिसर्‍या एका आख्यायिकेनुसार पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गातील एक दिवस मानला जातो. या रात्री भगवान शिव विश्रांती घेतात. त्यांच्या या विश्रांती घेण्याच्या काळालाच महाशिवरात्री म्हटले जाते.

महादेवाची ही आरती म्हणावी – लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, वीषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahashivratri 2024 know puja timings fasting rule things to offer lord shiva and rituals pmd 64 css