अमरावती : महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते, पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्‍यांचे खरे वडील आहेत, असे खळबळजनक वक्‍तव्‍य श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थान संस्‍थेचे संस्‍थापक मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी अमरावतीतील कार्यक्रमात केले आहे. वादग्रस्‍त वक्‍तव्‍यामुळे यापूर्वीही ते अनेकवेळा चर्चेत आले आहेत. बडनेरा मार्गावरील जय भारत मंगलम येथे गुरुवारी रात्री संभाजी भिडे यांच्‍या सभेचे आयोजन करण्‍यात आले होते.

भिडे म्‍हणाले, मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले, त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले असल्याचे सबळ पुरावे उपलब्ध असल्याचा दावाही यावेळी संभाजी भिडे यांनी केला.

Rahul Gandhi on Vinayak Damodar Savarkar
Rahul Gandhi: वीर सावरकरांच्या बदनामी प्रकरणी राहुल गांधींना पुणे न्यायालयाचे समन्स; ‘या’ तारखेला हजर राहण्याचे आदेश
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Sushil Kumar Shinde Book, Veer Savarkar
Sushilkumar Shinde : सुशीलकुमार शिंदेंच्या पुस्तकात वीर सावरकरांच्या कार्याचा गौरव, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “राहुल गांधींनी….”
devendra fadanvis on congress
Devendra Fadnavis : “महात्मा गांधींनी सांगितलं होतं की काँग्रेसचं विसर्जन..”, देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
tamil nadu cm mk stalin appointed his son udhayanidhi as deputy chief minister
अन्वयार्थ : घराणेशाही कालबाह्य!
Kolhapur hasan mushrif marathi news
गुरुदक्षिणेऐवजी देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसला, हसन मुश्रीफ यांचे समरजित घाटगेंवर टीकास्त्र
Former MP Rajan Vikhare criticizes Chief Minister Eknath Shinde
लाज असेल तर माफी मागा, माजी खासदार राजन विचारे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका
Who was CPI(M) General Secretary Sitaram Yechury in marathi
अग्रलेख : उजवा डावा!

हेही वाचा – “हिंदू समाज स्वार्थापोटी सख्ख्या भावालाही दगा…”, शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडेंचं वक्तव्य

देशामध्‍ये सर्वधर्मसमभावाचा उपदेश नकोच. अशा प्रकारचा उपदेश देणाऱ्या नेत्यांना राजकारणातून हद्दपार करावे, असे आवाहन संभाजी भिडे यांनी केले. हिंदुस्थान हा जगाच्या पाठीवरील एकमात्र हिंदू बहुसंख्य देश आहे. हिंदूंचे शौर्य अफाट आहे. परंतु हिंदू स्वतःचा धर्म, कर्तव्य, जबाबदाऱ्या विसरला. हिंदुस्थानची फाळणी होऊन देश षंढ पुढाऱ्यांच्या हाती गेला आणि हिंदूंची व हिंदुस्थानची अधोगती झाली, असे ते म्‍हणाले.

हेही वाचा – “पती आपल्या पत्नीच्या पोटातून मुलाच्या रुपाने जन्म घेतो”, संभाजी भिडेंचा अजब तर्क

कार्यक्रमापूर्वी भीम आर्मी, भीम ब्रिगेड आणि वंचित बहुजन आघाडीच्‍या कार्यकर्त्‍यांनी कार्यक्रमस्‍थळाजवळ भिडे यांच्‍या विरोधात आंदोलन केले. काही ठिकाणचे पोस्‍टरही फाडण्‍यात आले. त्‍यांना पोलिसांनी ताब्‍यात घेतले.