लोकसत्ता टीम

नागपूर : राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त असलेली महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व‎ प्रशिक्षण संस्था (महाज्योती) ही मूल्याधिष्ठ शिक्षणाचा प्रसार ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी काम करीत आहे.

Aditi Tatkare, Ladki Bahin Yojana, Ladki Bahin Yojana Fund, Fund Issue, Aditi Tatkare Pune,
लाडक्या बहीण योजनेसाठी इतर कोणत्याही विभागाचा निधी वळविण्यात आलेला नाही – मंत्री आदिती तटकरे
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Buldhana ST, ST benefits , maharashtra Assembly elections ,
बुलढाणा : निवडणुकीमुळे एसटी महामंडळाचेही चांगभलं, तब्बल पाऊण कोटीचा…
Majhi Ladki Bahin Yojana December Installment Updates in Marathi
Ladki Bahin Yojana December Installment : लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये जमा; २१०० रुपये कधी मिळणार? अर्जांची छाननी होणार का? सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या!
MPSC, MPSC Age Increase, MPSC Student,
सिंधुदुर्ग : एमपीएससी विद्यार्थ्यांना राज्य शासनाने वयवाढीचे दाखविले गाजर! आगामी होणाऱ्या परीक्षेत लाखो विद्यार्थी अपात्र
NSUI, urban naxalites, students rights, NSUI latest news,
हक्कासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांना शहरी नक्षली ठरवण्याचा प्रयत्न – एनएसयूआय
Promotion Kalyan Dombivli Municipal corporation,
कल्याण डोंबिवली पालिकेतील ३४३ कर्मचाऱ्यांना पदोन्नत्ती
Maitri Clinic , Clinic , Maitri Clinic for boys and girls,
किशोरवयीन मुला-मुलींसाठी ‘मैत्री क्लिनिक’ ठरतेय आधार! साडे सोळा लाख मुला-मुलींना मार्गदशन…

महाज्योतीद्वारे एमएचटी-सीईटी, जेईई, नीट, संघ लोकसेवा आयोग (युपीएससी), महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी), पायलट ट्रेनिंग, पीएच.डी. स्कील डेवलपमेंट आदिंचे विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे. गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना महाज्योतीतर्फे दर्जेदार प्रशिक्षण मिळावे तसेच विद्यावेतनातून त्यांना अर्थसहाय्याचे पाठबळ देण्याचे मोलाचे कार्य संस्था करीत असल्यानेच आज राज्यातील हजारो विद्यार्थ्यांनी उतुंग यश प्राप्त केले आहे.

आणखी वाचा-नागपूर : नवख्यांना ठाणेदारी, दुय्यमचे वांदे! निम्यापेक्षा जास्त पोलीस ठाण्यात…

राज्यातील ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या विविध योजनांची माहिती पोहचण्याकरिता http://www.mahajyoti.org.in हे संकेतस्थळ तयार केले आहे. महाज्योतीच्या वेबसाईट वर विद्यार्थ्यांना जलद आणि सोप्या पद्धतीने पोहचण्याच्या उद्देशाने संस्थेने २४ जुलै रोजी मोबाईलचे क्यूआर कोड स्कॅनर तयार केले. अत्याधुनिक असलेले या स्कॅनर कोडवर असलेल्या संकेतस्थळावर २ लाखांच्यावर विद्यार्थ्यांनी भेट घेत विविध योजनांची माहिती जाणून घेतली.

महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी सांगितले की, राज्यातील ओबीसी, व्हिजेएनटी व एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गेल्या चार वर्षांपासून दर्जेदार प्रशिक्षण तसेच विद्यावेतनातून त्यांना अर्थसहाय्याचे पाठबळ देण्याचे मोलाचे कार्य संस्था करीत आहे. महाज्योतीद्वारे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रमाच्या जोरावर घवघवीत यश प्राप्त केले आहे.

आणखी वाचा-वर्धा : ‘समृद्धी’च्या नावाने शेतकरी मोडताहेत बोटं! शेतशिवारांचे झाले तलाव…

त्यामुळे महाज्योतीबाबत विद्यार्थ्यांना माहिती ही एक क्लिक वर प्राप्त व्हावी याकरिता स्कॅनर कोड तयार करण्यात आले असून दोन दिवसांत २ लाखांचा टप्पा संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी गाठला आहे. यामुळे महाज्योतीमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी आज उत्सूकतेने संस्थेच्या संकेतस्थळाला भेट देत असून ही अभिमानास्पद बाब असल्याचा विश्वास राजेश खवले यांनी व्यक्त केले.

महाज्योतीचे अध्यक्ष तथा इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी महाज्योतीमार्फत तयार केलेल्या स्कॅनर कोड द्वारे संकेतस्थळाला भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा-नागपूर : कानाला मोबाईल अन् हातात कारचे स्टेअरिंग, महिलेने तिघांना उडवले

अर्जासाठी मुदतवाढ

महाज्योती मार्फत जेईई, नीट करिता १० वी नंतर प्रशिक्षण देण्यात येते. सदरचे प्रशिक्षण हे दोन वर्षासाठी असून त्यासाठी विद्यार्थ्यांना मोफत टॅब व दररोज ६ जीबी डेटा देण्यात येतो. १० वी उत्तीर्ण झालेल्या व विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना महाज्योतीच्या या प्रशिक्षणाचा लाभ होणार आहे. या करिता महाज्योती संस्थेने इच्छुक उमेदवारांना ३० जुलै पर्यत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याने विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा, विद्यार्थी हा इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा. तसेच तो नॉनक्रिमिलेअर गटातील असावा अशी अट आहे.

Story img Loader