मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान जाहीर केले, पण महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेला पात्र असलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही लाभ देण्यात आलेला नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे. धान उत्पादक शेतकरी कर्ज फेडू न शकल्यामुळे ते महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेकरिता पात्र ठरले. पण त्यांना लाभ मिळाला नाही.

हेही वाचा : विश्लेषण: कोणत्या वयात मुलांच्या हातात ‘स्मार्टफोन’ देणे योग्य? पाश्चिमात्यांच्या संशोधनातून काय दिसून आले?

BJP leaders and Nagpukars also believe devendra fadnavis will become Chief Minister
फडणवीसांच्या नागपुरात ना आरती, ना यज्ञ, पण लोकांना विश्वास ‘तेच’ होणार …
Chandrapur tiger death marathi news
चंद्रपूर : आठ महिन्यांच्या वाघाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Deadly attack on NCP taluka president Sunil Kolhe in Buldhana
बुलढाणा : खळबळजनक! राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला
Neerva female leopard gives birth to cubs in Kuno National Park in Madhya Pradesh
कुनोत पुन्हा एकदा पाळणा हलला.. मादी चित्ता ‘निरवा’ने..
How did Aleem Patel of Azad Samaj Party get 54 thousand 591 votes
अलीम पटेल यांना चक्क ५४ हजार मते; कशी साधली किमया…
Railway Minister Ashwini Vaishnav visited Deekshabhoomi
रेल्वेमंत्री अचानक पोहोचले दीक्षाभूमीवर… निवडणुकीआधी त्यांचा…
Dadarao Keche decided to retire from politics and changed his stance again
निकालाच्या एक दिवसाआधी राजकीय संन्यास; पण, पक्ष विजयी होताच माजी आमदाराने…
Zeenat tigress from Tadoba reached forest of Similipal
ताडोबातील ‘झीनत’ सिमिलीपालच्या जंगलात पोहोचली…

दिवसेंदिवस वाढणारी महागाई, शेतीसाठी लागणारा खताचा खर्च, इंधन वाढल्यामुळे ट्रॅक्टरच्या भाड्याचा खर्च, धानावर येणाऱ्या रोगांमुळे औषधाचा खर्च, वाढती शेतमजुरीचा खर्च तसेच इतर सर्व बाबींचा खर्च आणि पिकांवर येणारे अनेक नैसर्गिक संकट यामुळे उत्पादन कमी होत आहे. एवढा खर्च असताना केंद्र सरकारकडून मिळणारा हमीभाव तुटपुंजा आहे. महाविकास आघाडीचे सरकार येताच महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्याचा निर्णय झाला. त्या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. पहिल्या टप्प्यात बऱ्याच शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला. त्यानंतर करोना आल्यामुळे पुढील टप्प्यातील लाभ हे संकट आटोक्यात आल्यानंतर दिला जाईल असे, आश्वासन सरकारकडून देण्यात आले. तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ५० हजार रुपये अनुदान देण्याचे आश्वासन दिले गेले. पण अजूनही लाभ मिळाला नाही, असे विनोद दयारामजी मेंढे (घोडेझरी, तालुका लाखांदूर, भंडारा) यांनी सांगितले.

हेही वाचा : ‘एसटी’तील अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात; महामंडळाकडून दिवाळी भेट नाही

दरम्यान, एकनाथ शिंदे सरकार येताच नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचा शासन निर्णय काढण्यात आला व पात्र शेतकऱ्यांची यादी ही प्रसिद्ध केली. काही शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळू लागले. पण कर्जमाफी झालेली नाही, असेही ते म्हणाले. कर्जमाफीच्या पहिल्या यादीत नाव आले असूनही कर्जमाफी झाली नाही. तसेच मागील वर्षीचा धानाचा बोनस देखील मिळालेला नाही. सरकारने दिवाळी आधी किमान बोनस तात्काळ द्यावा, असे शेतकरी विनोद मेंढे (घोडेझरी, ता. लाखांदूर जि. भंडारा) म्हणाले.