वाशीम : जिल्ह्यातील वाशीम, मानोरा बाजार समितीच्या काल झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. वाशीममध्ये एकूण १८ जागांपैकी ४ जागांचे निकाल जाहीर करण्यात आले असून, महाविकास आघाडी समर्थित उमेदवार ४ जागांवर विजयी झाले आहेत, तर मानोरा येथे महाविकास आघाडी समर्थित ४ जागांवर, भाजपाने १ तर एक अपक्ष विजयी झाला असून महाविकास आघाडीने सरशी घेतली आहे.
हेही वाचा – पालक, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे: शाळांच्या निकालाची तारीख बदलली, जाणून घ्या सविस्तर..
जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाची बाजार समिती म्हणून वाशीम बाजार समिती ओळखली जाते. पहिल्या टप्प्यात सहापैकी वाशीम व मानोरा बाजार समिती निवडणुकीसाठी २८ एप्रिलला मतदान पार पडले. दोन्ही बाजार समितीच्या निवडणुकीत सध्यातरी महविकास आघाडीने खाते उघडले आहे. वाशीममध्ये १८ संचालक पदांपैकी ४ जागांवर महविकास आघाडी, तर मानोरा येथे १८ जागांपैकी महाविकास आघाडीचे ४ उमेदवार विजयी झाले तर भाजपाने १ जागी विजय मिळविला, एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. मतमोजणी सुरू असून कुणाचे वर्चस्व प्रस्थापित होणार, कुणाचे गड ढासळणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.