कर्नाटक च्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या महत्त्वाकांक्षा वाढलेल्या आहे. राज्यात सत्ता बदल होऊ शकतो म्हणून प्रत्येक जण त्या धावपळीत लागले आहे. मात्र यातूनच त्यांचा सत्तेत येण्याचा मार्ग थांबणार सुद्धा आहे असे चित्र दिसत असल्याचे मत आमदार बच्चु कडू यांनी व्यक्त केले. पुढील काळात निर्माण होणाऱ्या राजकीय स्थिती आम्ही समोर जाणार आहोत. युतीने म्हटले तर युतीत नाही तर एकटे लढणार आहे. कसे लढू ते योग्य वेळी ठरवू. या संदर्भात अजून चर्चा केली नाही मात्र ज्यावेळी चर्चा करू त्यावेळेस मागणी करू, परिस्थिती नुसार किती जागा लढायच्या याबाबत निर्णय घेऊ, शेवटी जिंकणे महत्वाचे असते असेही कडू म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा