राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अधिसभा नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळे लढल्याने मतविभाजनाचा जबर फटका महाविकास आघाडी आणि समविचारी इतर संघटनांना बसला आहे. गुरुवारी पहाटे ५ वाजतापर्यंत संपूर्ण मतमोजणी पूर्ण झाली असून या निवडणुकीत १० पैकी आठ जागांवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विजय मिळवला तर एका जागेवर महाविकास आघाडी व एका जागेवर युवा ग्रॅज्युएट फोरमला समाधान मानावे लागले.

हेही वाचा >>>भंडारा : धक्कादायक! सिरेगावटोला येथील अख्खे आदिवासी कुटुंब १६ दिवसांपासून बेपत्ता

Hindra Thakur Vasai program, Hindra Thakur,
वसई : ‘आमने सामने’ कार्यक्रमात ठाकुरांचेच वर्चस्व, हितेंद्र ठाकुरांसमोर विरोधक फिरकलेच नाहीत
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?
Assembly Elections 2024 Akkalkuwa-Akrani Assembly Constituency Congress
लक्षवेधी लढत: अक्कलकुवा: लोकसभेतील पराभवाचे उट्टे काढणार का?
Jharkhand campaign trail
आश्वासनं देण्याची चढाओढ, झारखंडमझ्ये भाजपा-इंडिया आघाडीत वेगळीच स्पर्धा!
maharashtra assembly election 2024, Amravati District,
अमरावती जिल्ह्यात महाविकास आघाडी, महायुतीसमोर अस्तित्व राखण्‍याचे आव्‍हान
Sharad Pawar, Sudhir Kothari Hinganghat,
वर्धा : अखेर शरद पवार थेट ‘हिंगणघाटच्या शरद पवारां’च्या घरी, म्हणाले…
maharashtra vidhan sabha election 2024,
पलूसमध्ये विश्वजित कदम, संग्रामसिंह देशमुखांमध्ये चुरशीची लढत

राखीव प्रवर्गातील जागांचा निकाल पहिल्याच दिवशी जाहीर झाला असला तरी खुल्या वर्गाची मतमोजणी गुरुवारी पहाटे पाच वाजतापर्यंत चालली. नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघाच्या खुल्या प्रवर्गातील ५ जागांकरिता एकूण १३,९४९ मतदारांनी मतदान केले. यात १२,२५४ मते वैध तर १६९५ मते अवैध ठरली. या पाच जागांकरिता २०४३ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. पहिल्या फेरीअखेर कोणत्याच उमेदवाराने निश्चित मतांचा कोटा पूर्ण केला नाही. त्यामुळे पहिल्या फेरीनंतर बाद फेरीस सुरुवात करण्यात आली. बाद झालेल्या १९ उमेदवारांना मिळालेली अन्य पसंती क्रमाच्या मतांची फेरी निहाय मोजणी करण्यात आली. त्यानंतर सर्वाधिक मते घेणाऱ्या अनुक्रमे पाच उमेदवारांना विजयी घोषित करण्यात आले.

खुल्या प्रवर्गातून एकूण २५ उमेदवारांपैकी ॲड. मनमोहन वाजपेयी हे २०७४ मते, विष्णू चांगदे हे २०१६ मते, मनिष वंजारी १९६२ मते, राहुल हनवटे १५४६ मते तर अजय चव्हाण १४६६ मते घेऊन विजयी ठरले. मतमोजणी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजू हिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिसदस्यीय समितीमधील सदस्य डॉ. शामराव कोरेटी, डॉ. रवीन जुगादे, डॉ. रूपेश बडेरे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपकुलसचिव प्रदीप बिनीवाले, उपकुलसचिव डॉ. राजेंद्र उतखेडे, विशेष कार्य अधिकारी वसीम अहमद यांच्या नेतृत्वात पार पडली. यावेळी मेहताब खान, संजय भोयर, गणेश कुमकुमवार, शैलेश राठोड, मनीष झोडपे, प्रवीण गोतमारे, सलीम शाह, स्वप्निल मोडक, नितीन खरबडे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

हेही वाचा >>>“ऑस्करसाठी निवड होणे म्हणजे सर्वश्रेष्ठ चित्रपट असे होत नाही”, नागराज मंजुळेंनी व्यक्त केले मत

ॲड. वाजपेयी चौथ्यांदा अधिसभेवर
काँग्रेस नेते गिरीश पांडव यांच्या विद्यार्थी संग्राम परिषदेच्या माध्यमातून महाविकास आघाडीमध्ये सहभागी झालेले ॲड. मनमोहन वाजपेयी चौथ्यांदा अधिसभेवर पदवीधर गटातून निवडून आले. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या गटाचा पराभव झाला असला तरी पांडव यांचे उमेदवार विजयी झाल्याने त्यांचे वर्चस्व कायम आहे. ॲड. वाजपेयी यांची विजयी रॅली काढण्यात आली. यावेळी पांडव स्वत: उपस्थित होते.

हेही वाचा >>>चंद्रपूर: नगरोत्थान निधी वाटपावरून भाजपात घमासान, नगरसेवक नाराज

युवा ग्रॅज्युएट पहिल्याच प्रयत्नात यश
अधिसभेच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच उतरलेल्या अतुल खोब्रागडे यांच्या युवा ग्रॅज्युएट फोरमने एका जागेवर विजय मिळवला. इतर जागांवर ते पराभूत झाले असले तरी त्यांच्या उमेदवारांना मिळालेली मते ही महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या बरोबरीची होती. त्यामुळे यंदाची निवडणूक त्रिशंकू ठरली.

समविचारी संघटना वेगवेगळ्या लढल्याने मतविभागजनाचा फटका आम्हाला बसला. एका बाजूला अभाविप तर एका बाजूला अन्य चार उमेदवार असे चित्र होते. त्यामुळे मतांचे मोठ्या प्रमाणावर विभाजन झाले. भविष्यात यावर सर्वांनी चिंतन करण्याची गरज आहे. – डॉ. बबनराव तायवाडे, काँग्रेस नेते.