नागपूर : काँग्रेस, उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट यांनी कंत्राटी भरतीचे आदेश काढून युवकांची दिशाभूल केली. त्यांनी जनतेची माफी मागावी अन्यथा राज्यात उद्या  शनिवारी सकाळी १० वाजता भाजप तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. उद्धव ठाकरे सारखा खोटारडा माणूस पहिला नाही. त्यांनीही तर जनतेची नाक घासून माफी  मागायला पाहिजे. फडणवीस यांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे,शरद पवार यांच्या काळातील कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द केला आहे.

महाराष्ट्रातील युवकांच्या वतीने शिंदे  सरकारचे अभिनंदन करतो. राज्यातील युवक या निर्णयाची प्रतीक्षा करत होते. आंदोलनात मी स्वतः नागपुरात सहभागी होणार आहे. आम्ही सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही असे आंदोलन करणार आहे. मात्र बोलघेवढ्या नेत्यांना धडा  शिकवू असेही बावनकुळे म्हणाले. या आंदोलनात अजित पवार आणि शिंदे गटही सहभागी होईल. मी दोघांशी बोलनार आहे.

Story img Loader