वाशीम : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी आज जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात पिठासून अधिकारी प्रकाश राऊत यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. यावेळी अध्यक्ष पदासाठी तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे तर उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे तत्कालीन सभापती चक्रधर गोटे यांचेच अर्ज दाखल झाल्याने अध्यक्ष पदावर राष्ट्रवादीचे चंद्रकांत ठाकरे तर उपाध्यक्ष पदावर काँग्रेसचे चक्रधर गोटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निमित्ताने पुन्हा एकदा जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचाच झेंडा फडकवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> वाशीम : मजुरांनो, काम करताना जीवाला जपा!; मळणी यंत्रात अडकून युवकाचा मृत्यू

हेही वाचा >>> ‘त्या’ २६३ आदिवासींच्या मृत्यूंची न्यायालयीन चौकशी करा ; जनहित याचिकेतून मागणी

अडीच वर्षांचा अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर शुक्रवारी (ता. १४) वाशीम जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. मागील अडीच वर्षांच्या कार्यकाळातही महाविकास आघाडीचीच सत्ता असल्याने यावेळीही महाविकास आघाडीची सत्ता कायम ठेवत वाशीम जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचेच वर्चस्व कायम राहिले. वाशीम जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस १४, काँग्रेस ११, शिवसेना ६, जनविकास आघाडी ६, वंचित बहुजन आघाडी ६, स्वाभिमानी शेतकरी संघटना १, अपक्ष १ आणि भाजपचे ७ असे पक्षीय बलाबल असून ५२ सदस्य संख्या आहे. जिल्हा परिषद सत्तास्थापेनासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेश मापारी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित झनक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी महाविकास आघाडीचीच सत्ता राहणार असल्याची भूमिका घेतल्याने जनविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी व इतरांनी आपला पाठिंबा दिल्याने निवडणूक बिनविरोध पार पडली.

हेही वाचा >>> पक्षाला संजय राऊतांसारखा उत्तम प्रवक्ता हवा आहे… आहे का कुणी?

जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक २०२० मध्ये झाली होती. त्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर वाशीम जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण प्रवगार्साठी राखीव निघाले होते. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी अनुक्रमे चंद्रकांत ठाकरे तर चक्रधर गोटे यांचेच अर्ज दाखल झाल्याने जिल्हा परिषद अध्यक्षपदी चंद्रकांत ठाकरे तर उपाध्यक्ष पदासाठी चक्रधर गोटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत यांनी कामकाज बघितले. महाविकास आघाडीवर पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा झेंडा फडकला असून ढोल ताशांच्या गजरात नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष यांची मिरवणूक काढण्यात आली.