केंद्रीय मंत्री, उपमुख्यमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या गृह जिल्ह्यात पंचायत समिती सभापती, उपसभापतीच्या निवडणुकीत काँग्रेसने मुसंडी मारली असून भाजपला मोठा धक्का बसला आहे. प्रतिष्ठेच्या लढतीत नागपूर जिल्ह्यातील तेरा पंचायत समितीचे सभापती व उपसभापती निवडणूकीत काँग्रेसचे ९ ठिकाणी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ३ ठिकाणी सभापती निवडून आले असून काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे.

हेही वाचा- अकोला : भारत तोडो’ वाल्यांनी भुगोलाचा अभ्यास करावा ; काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता अतुल लोंढेंचे भाजपला प्रत्युत्तर

Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
Shyam Manav comment on Ladki Bahin Yojana,
‘लाडकी बहीण योजना अर्थव्यवस्थेला चालना देणारी’, काँग्रेसच्या सभेत अंनिसचे श्याम मानव म्हणाले….
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
Sagar Meghes pointed speech front of nitin gadkari is getting discuss
‘तीनदा पराभव, डॉक्टर अन् राजकारणाचा किडा…’ सागर मेघे यांच्या टोकदार भाषणाची गावभर चर्चा…
Ramdas Athawales message of unity to Advocate prakash ambedkar
रामदास आठवलेंकडून ॲड.आंबेडकरांना पुन्हा ऐक्याची साद; म्हणाले, ‘आपण दोघेही नरेंद्र मोदींच्या..’
washim assembly constituency dispute within mahayuti
महायुतीमध्ये असंतोषाची दरी, बंडखोरीमुळे वाशीम जिल्ह्यात वाद वाढले; कारवाईत पक्षपातीपणा?

नागपूर जिल्ह्यात १३ पंचायत समितीमध्ये सभापती व उपसभापतीची निवडणूक होती. त्यात तेरा तालुक्यांमध्ये भाजपाचा कुठल्याही पंचायत समितीत सभापती होऊ शकला नाही. केवळ दोन तालुक्यात उपसभापती पदावर भाजपाला समाधान मानावे लागले आहे.

हेही वाचा- बुलढाणा : विदर्भातील काँग्रेसच्या ११ नेत्यांवर ‘भारत जोडो’ची विशेष जवाबदारी

मिळालेल्या माहितीनुसार १३ पंचायत समितीच्या निकाला पैकी काँग्रेस ९, राष्ट्रवादी काँग्रेस ३, शिवसेना १ जागेवर विजयी झाले आहे. नागपूर जिल्ह्यातील काँग्रेस- उमरेड, कुही, भिवापूर, कामठी, मौदा, पारशिवनी, सावनेर, कळमेश्वर, नागपूर (ग्रामिण), राष्ट्रवादी काँग्रेस – हिंगणा, काटोल, नरखेड, रामटेक – सेना या तालुक्यात पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडणूका पार पडल्या. माजी मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात व नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसने यश मिळविले. नागपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघात विजयी झालेल्या पंचायत समितीचे सभापती व उपसभापती यांचे राजेंद्र मुळक यांनी अभिनंदन केले आहे.