नागपूर: महावितरणकडे प्रत्येक वीज ग्राहकांच्या सुरक्षा ठेवी जमा असतात. या ठेवींच्या बदल्यास महावितरणने ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस रहिवासी असलेल्या नागपूर परिमंडळातील वीज ग्राहकांना २०२३- २४ या आर्थिक वर्षात २७ कोटी ७८ लाख ८०६ रुपये व्याज देण्याचे निश्चित केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
महावितरणने ग्राहकांना देऊ केलेल्या व्याजामध्ये नागपूर जिल्ह्यातील १६ लाख ७ हजार ३४८ ग्राहकांना २३ कोटी ८४ लाख ३८ हजार ३२० रुपये तर वर्धा जिल्ह्यातील ४ लाख ३३ हजार ६०९ वीज ग्राहकांना ३ कोटी ९४ लाख ६ हजार ४८६ रुपयांचे व्याजाचा समावेश आहे. राज्यातील इतर ग्राहकांनाही या प्रमाणात सुरक्षा ठेवींवर व्याज मिळणार आहे. ही रक्कम ग्राहकांच्या वीज देयकात समयोजित करण्यात येत आहे. वीज ग्राहकांना महावितरणकडून सुरक्षा ठेवचे देयक जाताच ही सुरक्षा ठेव म्हणजे काय? दरवर्षी ती का घेतल्या जाते? त्यावर व्याज मिळते का? असे एक नाही तर असंख्य प्रश्न पडतात.
हेही वाचा: चंद्रपूर: दोन बछड्यांसह मादी बिबटचा गावात धुमाकूळ; घरात मांडले ठाण, सहा जणांना…
मुळात वीज ग्राहकांकडून घेतलेली सुरक्षा ठेव ही ग्राहकांच्याच कल्याणासाठी महावितरणतर्फे वापरल्या जाते, त्यावर भारतीय रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी निश्चित केलेल्या दरानुसार व्याजही दिले जाते. महावितरण ही ग्राहकांच्याच भरवश्यावर चालते, ग्राहकांनी भरणा केलेल्या वीज बिलाच्या रकमेतूनच वीज खरेदी, वीजवहन आणि वितरण, देखभाल आणि दुरुस्ती तसेच प्रशासनावरील खर्च भागविला जातो. अश्या वेळी ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे बिल नियमित भरले तरच वीज खरेदी व वितरण करणे महावितरणला सहज शक्य होते.
सुरक्षा ठेव कशी निश्चित होते..
वीज वितरण कंपनी वर्षातून एकदा वीज वापराच्या अनुषंगाने सुरक्षा ठेवीचे पुनर्निधारण करू शकते. एखाद्या ग्राहकाची सुरक्षा ठेव ही त्याच्या आर्थिक वर्षातील दोन महिन्याच्या सरासरी रकमेपेक्षा कमी असेल तर संबंधित ग्राहकाला अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बिल दिल्या जाते. वीज ग्राहकांनी यापूर्वी सुरक्षा ठेव जमा केली असली तरी वीजदर आणि वीजवापर यामुळे वीजबिलाची रक्कम वाढली असेल तरच त्यातील फ़रकाच्या रकमेचे बील म्हणून अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे देयक दिल्या जाते. ज्या ग्राहकांनी अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा महावितरणकडे भरणा केला नसेल त्यांची ती थकबाकी सुरक्षा ठेवीतील व्याजमधून वळती करण्यात येत आहे.
हेही वाचा : राज्यात लवकरच १२ वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्र, निम्मी वाहने…
वीज नियामक आयोगाचे आदेश काय?
वीज ग्राहकांनी जमा केलेल्या सुरक्षा ठेवीवर कालावधिनुसार भारतीय रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी ठरवून दिलेल्या दराप्रमाणे व्याज देण्याचेही नियामक आयोगाचे निर्देश आहेत. महावितरणकडे जमा असलेली सुरक्षा ठेव ही ग्राहकांचीच रक्कम असून वीज पुरवठा कायमस्वरुपी बंद करतेवेळी ही ठेव ग्राहकाला व्याजासह परत केल्या जाते. त्यामुळे ग्राहकांनी अतिरीक्त सुरक्षा ठेवीचा वेळीच भरणा करुन सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
महावितरणने सुरक्षा ठेवीवर ग्राहकांना देण्यासाठी निश्चित केलेले व्याज
(आर्थिक वर्षे २०२३- २४)
विभाग | लघुदाब ग्राहक | निश्चित व्याज |
काँग्रेस नगर | २,७३,८२७ | ६,१२,४५,७२५.२१ |
सिव्हील लाईन्स | २,१५,४९२ | २,७३,४२,०२७.७३ |
महाल | २,९४,००९ | ४,३१,७३,७०२.०८ |
गांधीबाग | १,६१,०५३ | २,१३,१०,१९३.३२ |
बुटीबोरी विभाग | १,३०,५९४ | २,७५,७५,३४५.४९ |
मौदा विभाग | १,७०,३७०` | २,१५,०७,८४४.०२ |
उमरेड विभाग | १,०८,४६७ | १,०१,८५,६२१.०४ |
सावनेर विभाग | १,३७,८४२ | १,६१,४६,२००.६४ |
काटोल विभाग | १,१५,६९४ | ९९,५१,६६०.६५ |
आर्वी विभाग | १,३०,५३८ | १,०४,४०,०१२.४८ |
हिंगणघाट विभाग | १,१०,८९९ | ९६,९९,४३९.४१ |
वर्धा विभाग | १,९२,१७२ | १,९२,६७,०३४.४४ |
एकूण वर्धा जिल्हा | ४,३३,६०९ | ३,९४,०६,४८६.३३ |