बुलढाणा : बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील महायुती व आघाडी च्या उमेवारांची घोषणा कधी याबद्धलची उत्सुकता आता ताणल्या गेली. मतदारसंघातील राजकीय वर्तुळासह १७ लाख मतदारांना ही उत्सुकता आहे.
बुलढाणा मतदारसंघात युती व आघाडीचे उमेदवार जवळपास ठरले आहे. मात्र सध्याच्या अनपेक्षित धक्कादायक राजकारणाच्या काळात ‘काहीही’ होऊ शकते. यामुळे अनेकांना ऐनवेळी बदल होऊ शकतो अशी अजूनही भाबडी आशा आहे. मात्र युतीचे उमेदवार मावळते खासदार प्रतापराव जाधव आणि शिवसेना उबाठाचे जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर हे आघाडीचे उमेदवार राहणार हे जवळपास निश्चित आहे. जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनी याला दुजोरा दिला असून आपल्या नावाची चर्चा केवळ आणि केवळ अफवाच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मोठ्या राजकीय चमत्कारामुळेच बदल संभव आहे. वरिष्ठ सुत्रांनुसार आघाडीच्या नावाची घोषणा आज होणार आहे.
हेही वाचा…नागपूर : गुन्हेगारांकडे आढळळे ५ पिस्तूल आणि ९ काडतूस, विशेष मोहिमेत पोलिसांची कारवाई
दुसरीकडे युती मधील काही ठिकाणचा गुंता कायम आहे. पहिल्या यादीत प्रतापराव जाधव यांचे नाव राहणारच असा दावा शिंदेगटाच्या वरिष्ठ सूत्रांनी बोलून दाखविला. युती, आघाडीच्या उमेदवाराच्या नावांची औपचारिक घोषणा उत्सुकतेचा विषय ठरली आहे.
हेही वाचा…राज्यात तापमानवाढीचा इशारा, उष्णतेच्या झळा आणखी तीव्र होणार
आम आदमी पार्टीने अगोदरच जिल्हाध्यक्ष डॉ नितीन नांदूरकर यांची घोषणा केली आहे. आघाडी व वंचितची आघाडी फिस्कटल्यात जमा आहे. यामुळे वंचित युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी संपर्क सुरू केला आहे. दुसरीकडे लढतीतील दोन अपक्ष निश्चित आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर हे अपक्ष म्हणून लढण्यावर ठाम आहे. कोणत्याही स्थितीत लढणार असून २ एप्रिलला अर्ज भरणार असल्याचे तुपकर यांनी स्पष्ट केले. वन बुलढाणा मिशनचे संदीप शेळके हे रिंगणातील दुसरे अपक्ष राहणार आहे. आपण लढणारच असा दावा त्यांनी बोलून दाखविला.