मोदी सरकारने स्वयंपाकाच्या गॅसची किंमत वाढवून सामान्य जनतेचे कंबरडे मोडल्याचा आरोप करीत शुक्रवारी महिला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने व्हेरायटी चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करून केंद्र सरकारविरोधात रोष व्यक्त केला. महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चुलीवर स्वयंपाक करून निषेध केला.

हेही वाचा- अमरावती : ‘नवनीत राणा जात प्रमाणपत्रावर का बोलत नाहीत? सुषमा अंधारे यांचा सवाल

Black market , cooking gas cylinders,
पुणे : स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा काळाबाजार, सिंहगड रस्ता पोलिसांकडून ६१ सिलिंडर जप्त
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Pune, girl call center was attacked, yerawada area
पुणे : कॉलसेंटरमधील तरुणीवर सहकाऱ्याकडून कोयत्याने हल्ला, येरवडा भागातील घटना; हल्लेखोर ताब्यात
crime patrol fame actor raghav tiwari beaten up
Raghav Tiwari Attecked: ‘क्राईम पेट्रोल’फेम अभिनेत्यावर मुंबईत हल्ला; कलाकाराने सांगितला धक्कादायक घटनाक्रम!
The young man poured petrol on the snake
“देव माफ करेल कर्म नाही” तरुणानं सापावर पेट्रोल टाकलं अन् माणसांमध्ये जास्त विष असतं हे सिद्ध केलं; VIDEO पाहून संतापले लोक
Woman police officer assaulted by woman on bike
दुचाकीस्वार महिलेकडून महिला पोलिसाला धक्काबुक्की; वारजे भागातील घटना
Farmer Suicide Attempt Somthana , Buldhana District ,
VIDEO : धक्कादायक ! खरेदी केंद्रावरच शेतकऱ्याने अंगावर घेतले पेट्रोल! ओरडत म्हणाला…
minor boy killed by father and brother over talking to girl
पुणे : अल्पवयीन मुलाची हत्या; मुलीशी बोलत असल्याच्या रागातून दगडाने ठेचून खून

ईशान्येकडील राज्यांच्या निवडणुका आणि विविध राज्यातील पोटनिवडणुकी संपल्यानंतर घरगुती स्वयंपाकाच्या सिलिंडरचे दर ५० रुपये आणि व्यावसायिक सिलिंडरचे दर ३५० रुपयांनी वाढवण्यात आले. यामुळे बजेट कोलमडले असून जनतेत रोष निर्माण झाला आहे. त्याला वाचा फोडण्यासाठी महिला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आज निदर्शने केली, अशी माहिती दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी दिली.गॅस सिलिंडर भाव वाढल्याच्या विरोधात महिला काँग्रेसच्या अध्यक्ष नॅश अली यांच्या नेतृत्वाखाली व्हेरायटी चौकात आंदोलन करण्यात आले. गॅस सिलिंडरचे दर अचानक वाढल्याने या आंदोलक महिलांनी चक्क चुली पेटवून प्रतीकात्मक निषेध नोंदवला.

हेही वाचा- पोलिसांना केवळ अडीचशे रुपये ‘तंदुरुस्ती’ भत्ता!, १९८५ पासून रकमेत बदल नाहीच

केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरचे दर अन्यायकारकरित्या वाढवल्याने सर्वसामान्य कुटुंबाचे आर्थिक गणित बिघडले आहे, असे नॅशी अली म्हणाल्या.केंद्रातील मोदी सरकारने घरगुती गॅसच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. प्रचंड महागाईने सर्वसामान्यांचे जगणे कठीण होऊन बसले आहे. ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत नरेंद्र मोदी सत्तेवर आले आणि आता मतदान करणाऱ्या जनतेच जगणे कठीण करीत आहेत. त्यामुळे सरकारचा आम्ही निषेध करतो आणि ही दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी करतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे म्हणाले.

Story img Loader