वर्धा : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने २०२४ ला होणाऱ्या दहावी व बारावीच्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप बदलले आहे. सर्वात मोठा बदल म्हणजे आता ५० टक्के प्रश्न बुद्धीकेंद्रित सक्षमतेवर राहणार आहेत. अधिक विश्लेषणात्मक व संकल्पना आधारित प्रश्न विचारल्या जाणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – सोने खरेदी करायला जाताय, मग ‘हे’ वाचाच, नागपुरात सोन्याच्या दरात…

हेही वाचा – काळाचा घाला… कावडधारी शिवभक्ताचा ट्रकच्या धडकेत मृत्यू

प्रश्नांची विविधता एमसीक्यू, लहान उत्तरे व संक्षिप्त उत्तरे अश्या स्वरूपात प्रश्नपत्रिका येणार. जवळपास ४५ टक्के प्रश्नांचे एमसीक्यूमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. प्रत्येकी एक ते दोन गुण राहतील. मंडळाने हा बदल स्पष्ट करण्यासाठी नवीन नमुना प्रश्नपत्रिकांचे संच प्रसिद्ध केले आहे. येणाऱ्या परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न राहतील तसेच मार्किंग सिस्टीम कशी असेल, याचा बोध या नमुन्यातून घेणे शक्य होईल. मंडळाच्या वेबसाईटवर क्वेश्चन बँक नावाच्या विभागात ही माहिती उपलब्ध आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Major change in cbse exam pattern 10th and 12th questions on competence pmd 64 ssb
Show comments