बुलढाणा : चिखली एमआयडीसी मधील एका गोदामाला आज दुपारी आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे वृत्त आहे. चिखली येथील मेहकर राज्य महामार्गावर राज्य औधोगिक वसाहत आहे.
या ठिकाणी चिखली येथील व्यापारी अभय जैन यांचे गोदाम आहे. या गोदामाला आज २४ मे रोजी दुपारी अचानक आग लागली. पाहतापहाता ही आग भडकली. दरम्यान, याची माहिती मिळताच अग्निशमन दलाची चार वाहने घटनास्थळी दाखल झाली. आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समजते.