बुलढाणा : विदर्भाचे प्रवेश द्वार असलेल्या मलकापूर येथील आठवडी बाजारात काल मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत सहा दुकानें व त्यातील मालासह जळून खाक झाली. सुदैवाने जीवित हानी झाली नसली तरी व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.काल रविवारी १३ एप्रिल रोजी मध्यरात्री ही आग लागल्याचे परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले. स्थानिक रहिवासीयांनी ही माहिती मलकापूर नगर परिषदेचे अधिकारी, अग्निशमन दल कर्मचारी, संबंधित व्यापाऱ्यांना दिली. मात्र या आगीने उग्रस्वरूप धारण केल्याने अस्थायी स्वरूपाची सहा दुकानें त्यातील धान्य व इतर मालसह आगीच्या भक्ष्य स्थळी पडली.आपल्या दुकानांसह गोदाम वाचवण्यासाठी सर्वांची पळापळ सुरू झाली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्यासह पोलीस पथकआठवडी बाजार परिसरात दाखल झाले. मलकापूर नगर परिषदेच्या अग्निशमन दलानेही घटनास्थळी दाखल झाली आग विझवण्यास सुरुवात केली. नगर पालिकेचे भोपळे व पोलीस कर्मचारी आनंद माने यांनी सहकार्य केले केले. या आगीत ५ ते ६ दुकाने जळून खाक झाली. तसेच तर इतर दुकानांसह नजिकच्या गोदामांना आगीची झळ पोहोचली. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने संभाव्य अनर्थ टळला. आज सोमवारी, १४ एप्रिल रोजी दुपार पर्यंत आगीचे कारण कळू शकले नाही. त्यामुळे व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.शहरातील आठवडी बाजारात अनेक दुकाने, गोदामे असून, किरकोळ व्यापाऱ्यांच्या मोठा व्यवसाय चालतो. आज रात्री ११ वाजताच्या सुमारास आठवडी बाजारात भीषण आग लागली. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली.