नागपूर: मेजर जनरल एसके विद्यार्थी यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अतिविशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती भवनात मंगळवारी आयोजित एका सोहळ्यात त्यांना सन्मानित करण्यात आले.
मेजर जनरल एसके विद्यार्थी हे नागपूर येथे उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात सब एरियाचे जनरल ऑफिसर कमांडिंग म्हणून कार्यरत आहेत. मेजर जनरल एसके विद्यार्थी हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आहेत. त्यानंतर त्यांना ६५- अभियंता ब्रिज रेजिमेंटमध्ये नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी ३५ वर्षांच्या गौरवशाली कारकिर्दीत, नियंत्रण रेषा, उच्च उंचीचे क्षेत्र, वास्तविक नियंत्रण रेषा, वाळवंट आणि अर्ध वाळवंट क्षेत्रात सेवा दिली आहे. त्यांना त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला सेना पदकानेही सन्मानित करण्यात आले होते.