लोकसत्ता टीम

अमरावती : परतीच्‍या पावसाने जोरदार हजेरी लावल्‍यानंतर अमरावती विभागात रब्‍बीच्‍या पेरण्‍यांना गती मिळाली आणि पाचही जिल्‍ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पेरणी झाली आहे. विभागातील रब्‍बीच्‍या सरासरी ७ लाख ४६ हजार हेक्‍टर क्षेत्राच्‍या तुलनेत आतापर्यंत ८ लाख ६९ हजार हेक्‍टरमध्‍ये म्‍हणजे ११६ टक्‍के क्षेत्रात रब्‍बीचा पेरा झाला आहे.

मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
raining in Akola district during the winter season
अकोला: ऐन हिवाळ्यात पावसाचा तडाखा; वातावरणातील बदलाने…
Prices will increase due to reduced arrival of chillies Nandurbar news
यंदा लाल तिखटाचा भडका उडणार; मिरचीची आवक घटल्याने दर वाढणार
tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम
Air quality in Borivali and Malad is dangerous
बोरिवली, मालाडची हवा धोकादायक, महिन्यातील जवळपास वीस दिवस बहुतेक भागांत वाईट हवेची नोंद
forest fire cases
राज्यात तब्बल १६ हजारांहून अधिकवेळा जंगलाला आग
bullock cart race
मुरुड समुद्रकिनारी बैलगाडा शर्यतीच्या सरावाचा थरार, पर्यटकांचा मात्र थरकाप

अमरावती विभागात सर्वाधिक लागवडीखालील क्षेत्र हरभरा पिकाचे असून सरासरी ५ लाख २७ हजार हेक्‍टरच्‍या तुलनेत आतापर्यंत ६ लाख ३६ हजार ९७९ हेक्‍टरमध्‍ये हरभऱ्याची लागवड करण्‍यात आली आहे. बुलढाणा जिल्‍ह्यात २ लाख ३२ हजार ४०१ हेक्‍टरमध्‍ये (१५९ टक्‍के), अकोला ९९ हजार ५०७ हेक्‍टर (९९ टक्‍के) वाशीम ८० हजार ५५७ हेक्‍टर (१०५ टक्‍के), अमरावती १ लाख ८ हजार ५८१ हेक्‍टर (१०५ टक्‍के) आणि यवतमाळ जिल्‍ह्यात १ लाख १५ हजार ९३३ हेक्‍टर (१०० टक्‍के) क्षेत्रात हरभऱ्याचा पेरा झाला आहे.

आणखी वाचा-‘भारतरत्न’ कर्पुरी ठाकूर यांच्या ‘त्या’ नागपूर दौऱ्यात काय घडले होते?

विभागात गव्‍हाच्‍या लागवडीचे सरासरी क्षेत्र १ लाख ८३ हजार ४२७ असून आतापर्यंत १ लाख ९२ हजार ४२९ हेक्‍टर म्‍हणजे १०५ टक्‍के पेरणी आटोपली आहे. बुलढाणा जिल्‍ह्यात पावसाची तूट असल्‍याने या भागात गव्‍हाचा पेरा कमी झाला आहे. बुलढाणा जिल्‍ह्यात ४६ हजार ३६५ हेक्‍टरमध्‍ये (८४ टक्‍के) गव्‍हाचा पेरा झाला आहे. अकोला जिल्‍ह्यात २३ हजार ७२८ हेक्‍टर (१२३ टक्‍के), वाशीम ३३ हजार ७८७ हेक्‍टर (१३१ टक्‍के, अमरावती ४३ हजार ४५ हेक्‍टर (१०२ टक्‍के) आणि यवतमाळ जिल्‍ह्यात ४५ हजार ५०४ हेक्‍टर क्षेत्रात (११२ टक्‍के) पेरणी आटोपली आहे.

विभागात हरभरा पीक घाटे भरणे ते परिपक्‍वतेच्‍या अवस्‍थेत आहे. रब्‍बी ज्‍वारी पीक कणसे लागणे ते दाणे भरण्‍याच्‍या स्थितीत आहे. गहू लोंबी धरण्‍याच्‍या अवस्‍थेत, मका पीक तुरे ते कणसे लागण्‍याच्‍या, करडई पीक वाढीच्‍या ते फुलोरा अवस्‍थेत आहे. विभागात काही ठिकाणी हरभरा पिकावर घाटे अळी व मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. विभागात मका पिकाची लागवड १३ हजार २६० हेक्‍टर (९३ टक्‍के) क्षेत्रात करण्‍यात आली आहे. २ हजार ७९७ हेक्‍टरमध्‍ये करडई (३३५ टक्‍के) पिकाची लागवड करण्‍यात आली आहे. ५७६ हेक्‍टरमध्‍ये (३० टक्‍के) सूर्यफुलाची पेरणी झाली आहे.

आणखी वाचा-गरम तव्‍यावर बसणारा भोंदूबाबा! महिलेचे लैंगिक शोषण, चित्रफीतसुद्धा…

रब्‍बी ज्‍वारीचे क्षेत्र वाढले

ज्‍वारीला यंदा चांगला दर मिळत असल्‍याने रब्‍बी ज्‍वारीच्‍या क्षेत्रात मोठी वाढ दिसून आली आहे. शेतकरी या पिकाचा चारा म्‍हणूनही वापर करतात. अमरावती विभागात रब्‍बी ज्‍वारीचे लागवडीखालील सरासरी क्षेत्र १७ हजार ३९० हेक्‍टर असून हंगामात १९ हजार ९९१ हेक्‍टर ( ११५ टक्‍के) क्षेत्रात ज्‍वारीचा पेरा झाला आहे.

Story img Loader