राज्यातून माळढोक पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, अशी चर्चा सुरू असतानाच वरोरा तालुक्यातील एका शेतात माळढोक पक्षी आढळून आल्याने पक्षीमित्रांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
हेही वाचा- चंद्रपूर: विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचवण्यात यश
वन्यजीव अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी हा पक्षी माळढोक असल्याचे सांगितले. जिल्ह्यात माळढोक पक्षी शिल्लक राहिले नाही, अशी चर्चा सुरू होती. अशातच अचानक हा पक्षी दिसून आल्याने पक्षीमित्र सुखावले आहेत. माळढोक पक्षी भारतात तसेच पाकिस्तानमधील कोरड्या प्रांतात आढळून येतो. माळढोककडे अत्यंत दुर्मिळ पक्षी म्हणून बघितले जाते. या पक्ष्याच्या संरक्षणासाठी काही राज्यांनी ठोस पावले उचलली आहेत.
हेही वाचा- पक्षी, प्राण्यांपासून ‘ड्रोन’द्वारे पिकांचे संरक्षण; तरुण अभियंत्याचे संशोधन
माळढोक पक्षाला इंग्रजीत “ग्रेट इंडियन बस्टार्ड” असे नाव आहे. चंद्रपूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी नुकतीच माळढोक पक्ष्यांचे संवर्धन व्हावे यासाठी एक शासकीय समिती गठीत केली होती. आता माळढोक पक्षी दिसल्याने या समितीने अधिक सक्रिय होण्याची गरज आहे.