नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघप्रकल्पाने भल्याभल्यांना वेड लावले आणि त्यांना वेड लावणाऱ्या या व्याघ्रप्रकल्पातील वाघांनीही त्यांना निराश केले नाही. या व्याघ्रप्रकल्पात वाघीण आणि तिच्या शावकांनी पर्यटकांना कधी निराश केले नाही. मात्र, वाघांसोबत शावक हे दृश्य दुर्मिळच. वन्यजीवप्रेमी अरविंद बंडा मात्र याबाबत सुदैवी ठरले आणि मिळालेली ही संधी त्यांनी कॅमेऱ्यात कैद केली. वाघिणीने शावकांना जन्म दिल्यानंतर वाघाची जणू जबाबदारीच संपते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जन्माच्या पहिल्या दिवसापासून तर शावक दोन वर्षाचे होईपर्यंत ही सर्व जबाबदारी वाघीण पार पाडते. स्वत:ची शिकार स्वत: मिळवण्यापासून तर अधिवास निश्चित करेलपर्यंत वाघीणच सोबत असते. त्यामुळे वाघ आणि शावक अशी दृश्य क्वचितच व्याघ्रप्रकल्पात दिसून येतात. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील वाघीण आणि शावकाचे अनेक व्हिडिओ आतापर्यत समाजमाध्यमांवर प्रकाशित झाले आहेत, पण वाघांसोबत शावक क्वचितच आढळून आले. वन्यजीवप्रेमी अरविंद बंडा यांना ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील मामला क्षेत्रात ‘राका’ हा वाघ आणि सोबत त्याचे दोन शावक एकत्र खेळताना आढळले. हे दोन्ही शावक वाघाच्या अंगावर खेळत होते आणि ‘राका’ हा वाघ देखील त्यांचे हे बालपण तेवढ्याच प्रेमाने उपभोगताना आढळला.