चंद्रपूर : सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक २ अंतर्गत सण २०२४-२५ जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण या विशेष योजनेतून पोंभुर्णा येथील तालुका क्रिडा संकुल येथील मैदान विकसित करण्याच्या कामात गैरप्रकार झालेला असून २० लक्ष रुपयाचे मैदान विकसित करण्याचे काम न करताच काम पूर्ण झाल्याचे फलक लावून गैरप्रकार करून कंत्राटदारानी शासनाची फसवणूक केली आहे.

पोंभूर्णा तालुका क्रिडा संकूलात शासकीय विभागा मार्फत जिल्हात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनाची माहिती नागरिकांना होण्याच्या दृष्टीने दि.1ऑकटोबर ला महाराष्ट्राचे राज्यपाल सि.पी.राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत आदिवासी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.राज्यपाल यांच्या सुरक्षाच्या दृष्टीने क्रिडा संकुल मध्ये अनेक बदल करण्यात आले होते. सवरक्षण भिंती तोडून लोकांच्या येण्या – जाण्यासाठी मार्ग करण्यात आले होते. तसेच मैदानातील धावपट्टी, बास्केट बॉल मैदान, फुटबॉल मैदान व कसरतीचे साहित्य आदी वस्तू काढून ठेवण्यात आले होत. यात मोठया प्रमाणात साहित्याची व मैदानाची नासधूस झालेली होती. सदर कामाची डागडुजी व मैदान विकसित करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 चंद्रपूर सन-2024-25 जिल्हा वर्षिक योजना सर्वसाधारण या विशेष निधी उपलब्ध करून देत 20 लक्ष रुपयाची प्रशाकीय मान्यता देण्यात आली.त्यानुसार चंद्रपूर येथील क्रांती राज कारागीर आणि रंकम एम.एस.एस.,चंद्रपूर यांना याचे कंत्राट देण्यात आले होते. सदर मैदान विकसित करण्याचे काम न करता कंत्राटदार कंपनीने काम पूर्ण झाल्याचे फलक लावून गैरप्रकार केला आहे.कंत्राटदार येवढ्यावरच न थांबता सदर फलकावर 20 लक्ष रुपये येवढ्या रुपयाचे काम फक्त 13 दिवसात पूर्ण झाल्याचे नमूद केले आहे.

मैदान विकसित करण्याचे कोणतेही काम न करता लावण्यात आलेल्या फकलाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग मुकसमती देत कानाडोळा का करत आहे असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थितीत केला जात आहे. सदर कामाची चौकशी करून कंत्राटदार कंपनी व अभियंतावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिक करीत आहे.