वर्धा : तलाठी भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरून घेतल्या जात आहे. यात एका अर्जदारास एकाच ठिकाणाहून अर्ज करता येतो. मात्र काही जण दोन-तीन ठिकाणाहून अर्ज भरण्याचा गैरप्रकार करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने गैरमार्गाचा उपयोग करून अर्ज सादर न करण्याचे आवाहन केले आहे. काही आईच्या नावात बदल करतात.म्हणजे एका अर्जात आशा तर दुसऱ्या अर्जात आशाबाई असे लिहल्या जाते.काही दहावी परीक्षेच्या क्रमांकात बदल करून नव्याने अर्ज देतात.
ही परीक्षा दोन शिफ्ट मध्ये काही दिवस चालणार.त्याचा फायदा घेण्यासाठी असे प्रकार होत असल्याचे म्हटल्या जाते.पण ही बाब विद्यार्थ्यांना महागात पडू शकते, असा इशारा समितीने दिला आहे. लहानशी पण चूक केल्यास पकडल्या जाल .म्हणून विद्यार्थ्यांनी गैरप्रकार टाळावे, असे स्पष्ट करण्यात आले.ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आता १८ जुलै रात्री ११ वाजून ५५ मिनिटापर्यंत मुदत देण्यात आली आहे.२० जुलै पर्यंत ऑनलाईन शुल्क भरता येईल.