बुलढाणा: शेगाव येथील सराफा व्यापारी निलेश गणोरकर यांना गंडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या संभाजीनगर येथील ठगसेनास पोलिसांनी गजाआड केले आहे. विठ्ठल भालचंद्र सानप (५२, रा. राजीव गांधी नगर, सिडको, छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. त्याने शेगांव येथील  सराफाकडून सोन्याचे पेंडल खरेदी केले. तसेच गहूमनी खरेदी करायचे आहे अशी बतावणी करून त्यानंतर सोन्याच्या ४६ गहू मणीचे वजन घ्यायचे आहे असे सराफाला सांगितले.

हेही वाचा >>> पाच रुपयासाठी चोरट्यांनी फोडले वॉटर एटीएम; सिंदेवाही तालुक्यातील वासेरा गावातील प्रकार

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Marathi Actor Hemant Dhome has a new cow in his family
अभिनेता हेमंत ढोमेच्या कुटुंबात आली नवीन सदस्य, नाव आहे खूपच खास
Sanjay Bangar Son Aryan Becomes Anaya Shares Hormonal Transformation Journey Video on Instagram
Sanjay Bangar Son: भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलाची हार्माेन रिप्लेसमेंट थेरपी, आर्यनने नावही बदललं, VIDEO केला शेअर
ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
Germanys Warren Buffett Karl Hellerding
जर्मनीचा वॉरेन बफे : कार्ल हेलरडिंग
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?

मोड म्हणून आपल्या जवळील काही दागिने त्यांना दिले असता गणोरकर याना दागिने नकली असल्याचा  संशय आला.  त्यांनी शेगांव शहर पोलिसांना माहिती दिली असत पोलीसानी सानप यास ताब्यात घेतले.  त्याचेजवळून नगदी ८८ हजार  व काही पांढऱ्या- पिवळ्या धातूचे वस्तू ,दागिने  व  बनावट चांदी चे दागीने जप्त केले. सराफा  गणोरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सानप विरुद्ध भादवीच्या कलम ४२०,५११ नुसार  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तपास पोलीस उप निरीक्षक आशिष गंद्रे करीत आहे.

आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी

आरोपी सानप याची छत्रपती संभाजीनगर,  बीड व जालना यथे गुन्हेगारी पूर्वपार्श्वभूमी असल्याची माहिती मिळाली आहे. शेगाव पोलिसांनी त्याला पकडल्याने सराफा व्यवसायिकांच्या फसवणुकीच्या अनेक  गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.