–
हुडकेश्वर परिसरातील एका नराधमाने चक्क मादी श्वानाशी अनैसर्गिक कृत्य केले. हुडकेश्वर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. देवेंद्र गणपत भगत (४०) रा. शाहू नगर चौक, असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, देवेंद्र हातमजुरीचे काम करतो. तो मूळचा मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील कोथूलना येथील आहे.
हेही वाचा >>> नागपूर: विकृत व्यवस्थापक महिला सुरक्षारक्षकाला म्हणाला, ‘तुला नोकरी करायची असेल तर…’
बेसा येथील उद्यानात फिरणाऱ्या एका मादी श्वानाशी देवेंद्रने गुरुवारी दुपारी नैसर्गिक कृत्य केले. हा प्रकार तेथे फिरणाऱ्या एकाच्या निदर्शनात आल्यावर त्याने देवेंद्रच्या कृत्याची मोबाईलवर चित्रफित बनवली व ती एका व्हॉटसअप समुहावर टाकली. एका सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी ती बघितल्यावर श्वानाचा शोध घेऊन उपचार केले व हुडकेश्वर पोलिसांना तक्रार दिली. त्यानंतर आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. यापूर्वी पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात ऑगस्ट २०२२ मध्ये अशाच पद्धतीचा निंदनिय प्रकार पुढे आला होता.