नागपूर : एका व्यक्तीने मित्राला प्रेयसीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासह काही गुप्त गोष्टी सांगितल्या. त्या मित्राने मोबाईलमध्ये आवाज रेकॉर्ड केला. ती रेकॉर्डिंग समाज माध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देऊन मित्राच्या प्रेयसीला १ लाखाची खंडणी मागितली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली. इंद्रदेव घनश्यामी (जरीपटका) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला जरीपटक्यात राहते. तिचे एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध आहेत. तिच्या प्रियकराची आरोपी इंद्रदेव घनश्यामी याच्यासोबत मैत्री आहे. दोघेही सोबतच दारू पितात आणि एकमेकांसोबत राहतात. गेल्या काही दिवसांपूर्वी सदरमधील एका हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटमध्ये सापडलेल्या दोन रशियन युवतीला नागपुरात आणणाऱ्या दलालाशी घनश्याम याचे संबंध आहेत.

Bombay HC Nagpur Bench News
High Court : अल्पवयीन पत्नीशी संमतीनं ठेवलेले शरीरसंबंधही बलात्कारच; मुंबई हायकोर्टाचं १० वर्षांच्या शिक्षेवर शिक्कोमोर्तब
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Immediate relief, Nawab Malik, High Court,
नवाब मलिक यांना तूर्त दिलासा, मात्र….; वैद्यकीय जामिनावर असताना त्रासाविना प्रचार करत असल्याची उच्च न्यायालयाकडून दखल
300 crore extortion from female officer on fear of involvement in embezzlement Mumbai print news
३०० कोटींच्या गैरव्यवहारातील सहभागाची भीती दाखवून महिला अधिकाऱ्याकडून खंडणी उकळली; चौघांविरोधात गुन्हा
Mumbai High Court
“मुलीने हॉटेलची खोली बुक केली म्हणजे तिची शारीरिक संबंधांना संमती आहे असे नाही,” उच्च न्यायालयाचं परखड मत!
sexual harassment crime victim, compensation,
लैंगिक छळाच्या गुन्ह्यात पीडितेला नुकसान भरपाईचा आदेश देणे अपेक्षित…
BJP Party Worker Dead Body Found in Office
BJP Worker : भाजपा कार्यकर्त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह कार्यालयात सापडल्याने खळबळ, महिला अटकेत; कुठे घडली घटना?
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……

गेल्या काही दिवसांपूर्वी महिलेचा प्रियकर आणि इंद्रदेव हा सोबत दारू पित होते. यादरम्यान, मित्राने इंद्रदेवला प्रेयसीबाबत नेहमी शारीरिक संबंध प्रस्थापित करीत असल्याचे सांगितले. तसेच तिच्याकडे काही तरुणी असून त्यासुद्धा माझ्या मैत्रिणी असल्याचे सांगितले. यासह काही गुप्त बाबीसुद्धा इंद्रदेवला सांगितले. त्याने या सर्व गोष्टी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्या. ती रेकॉर्डिंग घेऊन तो मित्राच्या प्रेयसीच्या घरी गेला. तिला रेकॉर्डिंग समाजमाध्यमांवर प्रसारित करून पोलिसांचे छापे घालण्याची धमकी देऊ लागला. कारवाई टाळण्यासाठी तो महिलेला एक लाखाची खंडणी मागत होता. तसेच तो शारीरिक संबंधासाठी तिच्यावर दबाव टाकत होता. त्यामुळे महिलेने जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.