नागपूर : घरासमोर बहिणीसोबत खेळणाऱ्या आठ वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या एका ५६ वर्षीय आरोपीला पारडी पोलिसांनी अटक केली. गणपत जयपूरकर ( रा. जय दुर्गानगर भवानी मंदिर मागे, पारडी), असे आरोपीचे नाव आहे.  ही घटना मागील रविवारी घडली होती. पारडी परिसरात एक मजूर दाम्पत्य राहते. त्यांना दोन मुली आहेत. रविवारी दोन्ही मुली अंगनात खेळत होत्या. त्यावेळी  आरोपी गणपत तेथे आला. त्याने घरी पूजा असून पुजारी शोधत असल्याचे सांगितले.

हेही वाचा >>> चंद्रपूर : लोकप्रतिनिधींच्या मर्जीतील कंत्राटदारांना नोटीस; कारण काय?

Woman Raped By Mantrik in Mumbai
Mumbai Crime : महिलेवर बलात्कार करुन दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या मांत्रिकाला अटक, मुंबई पोलिसांची कारवाई
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Nagpur Crime News
Nagpur Crime : विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार करुन ब्लॅकमेल करणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञाला अटक, मोबाइलमध्ये आढळले आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ
Man arrested for attempting to rob minor girl Mumbai news
मुंबईः अल्पवयीन मुलीवर हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न करणारा अटकेत
Rape of a woman, lure of marriage, Pune, fraud,
पुणे : विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलत्कार, आरोपीकडून अधिकारी असल्याची बतावणी; ३८ लाखांची फसवणूक
14 year old girl pregnant loksatta news
Nagpur Crime News: १४ वर्षांची मुलगी तीन महिन्यांची गर्भवती, प्रियकराविरुद्ध गुन्हा
misunderstanding of kidnapping because of girl scream in car
कारमध्ये आरडाओरड करणे आले अंगलट, काय घडले?
gang-rape_
Kerala Horror : पाच वर्षांत ६४ जणांकडून लैंगिक अत्याचार, केरळमध्ये क्रौर्याची परिसीमा; व्हिडिओही केले होते व्हायरल!

घरात कोण आहे, असे विचारताच मुलींनी कुणीच नाही सांगितले. तिच संधी साधून गणपत ने २० रुपये एका आठ वर्षाच्या चिमुकलीला दिले. तिला वडिलाचा मित्र असल्याचे सांगितले. त्यानंतर मुलीला घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला आणि तो पळून गेला. सायंकाळी मुलीची आई आल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला. या प्रकरणी पारडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. राज्य महिला आयोगाच्या सदस्या आभा पांडे यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली. आरोपीला ताबडतोब अटक करण्याचे आदेश पोलिसांना दिले. या प्रकरणात मुलीला मनोधैर्य योजनेचा लाभ मिळवून देण्याचेही आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

हेही वाचा >>> धक्‍कादायक ! नात्याला काळीमा फासणारी ही संतापजनक घटना

पोलिसांनी राबवली शोध मोहीम

पारडी पोलिसांनी परिसरात सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात गणपत संशयस्पद स्थितीत दिसून आला. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी शोध मोहीम राबवली.  ६ तासानंतर आरोपीला तब्यात घेण्यात आले.

किशोरी पेडणेकर यांनी घेतली पीडित कुटुंबीयांची भेट

शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी आज सकाळी अकरा वाजता पीडित मुलीच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यांचा धीर दिला. त्यांची बाजू ऐकून घेतली आणि त्यांना मदतीचे आश्वासन दिले. त्यानंतर त्या पारडी पोलीस ठाण्यात पोहचल्या. त्यांनी ठाणेदार रणजित सिरसाठ यांची भेट घेऊन चर्चा केली.

Story img Loader