कारने विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या इसमास खामगाव येथील शिवाजी नगर पोलिसांनी अटक केली. या कारवाईत मदयसाठ्यासह चारचाकी देखील जप्त करण्यात आली. ठाण्याच्या गुन्हे शोध  पथकातील रवींद्र कन्नर, निलसिंह चव्हाण, संतोष वाघ, सागर भगत व संदीप टाकसाळ हे  काल मध्यरात्री  वाहन गस्त घालत होते. त्यांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून खामगाव ‘एमआयडीसी ‘  मधील महावितरण कार्यालया नजीक नाकेबंदी केली. यावेळी त्यांनी एम एच ०४ सीबी२२४० क्रमांकाच्या मारोती अल्टो कारची झडती घेतली. कारवाईत १९७ विदेशी दारूच्या  बॉटल्ससह चारचाकी वाहन जप्त करण्यात आले. प्रकरणी शेख समीर शेख जमीर( वय २३, राहणार रसुलपूर, तालुका नांदुरा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा