अमरावती : एका महिलेला अंघोळ करताना चोरून पाहणाऱ्या आरोपीला पकडून चांगलाच चोप देण्यात आला. त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले. गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. याप्रकरणी एका विवाहितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मोहम्मद नाजीस अब्दुल कय्युब याच्याविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

हेही वाचा >>> नागपूर : प्रेमाचा त्रिकोण; प्रियकराचा खून करण्याचा प्रयत्न

Crime News
Crime News : होमिओपॅथी डॉक्टरचे भयानक कृत्य! गर्लफ्रेंड आणि तिच्या वडिलांचा मृतदेह ४ महिने घरात दडवला, कुजू नयेत म्हणून…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
IT girl murder, rape case, Mumbai,
विश्लेषण : मुंबईत आयटी तरुणी हत्या, बलात्कार प्रकरणात तपासातील त्रुटींमुळे आरोपी निर्दोष… नेमके प्रकरण काय होते?
man killed his wife and son and create faked suicide
मुंबई : पत्नी व मुलाची हत्या करून आत्महत्येचा बनाव रचला, आरोपीला अटक
Case filed against women who brutally beat three-year-old son
तीन वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण करणाऱ्या आईविरोधात गुन्हा
woman alleges rape after locking in home forced for religious conversion
पुणे : धर्मांतर करण्यासाठी महिलेला डांबून ठेवून बलात्कार; विमानतळ पोलिसांकडून महिलेसह तिघांना अटक
Pune seen a rise in chain snatching cases
शहरात दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांचा उच्छाद; कोथरुड, बाणेर, कर्वेनगर भागातील घटना
Woman stabbed to death with scissors over family dispute in Kharadi area Pune news
पुणे: कौटुंबिक वादातून महिलेवर कात्रीने वार करुन खून; खराडी भागातील घटना, पती अटकेत

एक विवाहिता घरातील बाथरूममध्ये आंघोळ करीत होती. दरम्यान २५ वर्षे वयोगटातील एक तरूण बाथरूमचा पडदा उघडून आपल्याला पाहत असल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यामुळे तिने पतीला आवाज दिला. आरडाओरडीदरम्यान तो पळून गेला. मात्र महिलेने पतीच्या दुचाकीवर बसून लगेच आरोपीचा पाठलाग सुरू केला. गाडगेनगरकडे पळून जात असताना महिलेच्या पतीने त्याला पकडले. त्यावेळी परिसरातील नागरिक देखील गोळा झाले. पैकी काहींनी त्याला चांगला चोप देखील दिला. त्याला नाव विचारण्यात आले. घटनेची माहिती गाडगेनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. दरम्यान आरोपी मो. नाजीस हा त्या भागात महिनाभरापासून चकरा मारत असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींने सांगितले. आरोपीच्‍या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader