नागपूर : पहिल्या पत्नी असताना दुसरीसोबत संसार थाटला. पण तिच्या अनैतिक संबंधाची माहिती मिळाल्यावर दुसरी पत्नी व तिच्या मुलाचा खून करुन पतीने स्वतः आत्महत्या केली. रविवारी रात्री आठ वाजता तीनही मृतदेहांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. नाजनीन राऊत (२७, एकात्मतानगर) आणि युग राऊत (३) अशी खून झालेल्यांची तर सचिन विनोद राऊत (४०, भीमनगर, ईसासनी) असे खून करून आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे.
खासगी वाहन चालक असलेल्या सचिन राऊत याचे पहिले लग्न रुख्मिनी नावाच्या तरुणीशी झाले होते. त्याला दोन मुले आहेत. मात्र, गेल्या तीन वर्षांपूर्वी मध्यप्रदेशमधील नाजनीन या विवाहित महिलेशी त्याची ओळख झाली होती. दोघांचे सूत जुळले आणि सचिनने तिला नागपुरात पळवून आणले. तिला एकात्मतानगरात भाड्याने खोली करून ठेवले. त्यांना युग हा तीन वर्षाचा मुलगा झाला. तो पहिल्या पत्नीकडे आठवड्यातून पाच दिवस तर नाजनीनकडे दोन दिवस राहत होता.
हेही वाचा…मतदानापूर्वी गृहमतदान, काय आहे ही पध्दत?‘ हे ’ ठरले प्रथम गृह मतदार
दोन्ही संसार सुरळीत सुरु असतानाच गेल्या काही दिवसांपू्र्वी सचिनच्या दुसऱ्या लग्नाची माहिती पहिल्या पत्नीला कळली. त्यावरून पती-पत्नीत वाद झाले. त्यातून तो तणावात होता. त्यामुळे तो नाजनीनकडेच राहायला लागला. मात्र, नाजनीनला एका युवकाचा वारंवार फोन येत असल्यामुळे त्याला संशय आला. त्याने विचारपूस केली असता तिने मित्र असल्याचे सांगून वेळ मारून नेली. त्यामुळे त्याने नाजनीनला जबर मारहाण केली.
हेही वाचा…‘हे’ प्रसिद्ध डॉक्टर व समाजसेवी काँग्रेसमध्ये? नेमके काय झाले, वाचा…
एका आठवड्यानंतर एक युवक नाजनीनशी बोलताना दिसला. त्यामुळे तिचे अनैतिक संबंध असल्याची खात्री झाली. तिनेही सचिनसोबत न राहण्याचा निर्णय घेतला. दोघांनी पाचशे रुपयांच्या स्टँपपेपरवर विभक्त होण्यासाठी करारनामा केला. नाजनीनने दिलेल्या धोका सचिनला पचवता आला नाही. त्यामुळे त्याने तिचा खून करण्याचे ठरविले. तिला शेवटचे भेटायचे असल्याचे सांगून त्याने नाजनीन आणि युगला ओयो हॉटेलमध्ये नेले. हॉटेलमध्ये नाजनीनच्या डोक्यात हातोडीने वार करून खून केला तर मुलगा युग याच्यावरही विष प्रयोग करून खून केला. त्यानंतर स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी शवविच्छेदन करून तीनही मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिले. एकाच ठिकाणी तिघांवरही अंत्यसंस्कार करण्यात आले.