लोकसत्ता टीम

नागपूर: गेल्या आठवड्याभरात उपराजधानीत पाचवे हत्याकांड उघडकीस आले असून सदरमध्ये पतीने पत्नीच्या डोक्यात हातोड्याने वार करून खून केला. त्यानंतर स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केली. ही थरारक घटना रविवारी सकाळी सात वाजता सदरमध्ये उघडकीस आली. सोनिया मंडाले (३८)असे खून झालेल्या पत्नीचे नाव असून राजेश मंडाले (४५, मॉईल वसाहत, छावणी) हा आरोपी पती आहे.

Crime News in marathi
Crime News : २५ वर्षीय विवाहितेच्या मृत्यूनंतर उलगडली छळाची आणि शोषणाची अंगावर काटा आणणारी कहाणी, कुठे घडली घटना?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
man killed his wife and son and create faked suicide
मुंबई : पत्नी व मुलाची हत्या करून आत्महत्येचा बनाव रचला, आरोपीला अटक
karnataka man suicide
Karnataka Suicide: ‘पत्नीने छळ केला’ म्हणत पतीची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये लिहिलं,”तिला माझं मरण हवंय”!
Newlywed women commits suicide after argument with mother in law over using sanitary pads
‘सॅनिटरी पॅड’वरुन वाद झाल्याने नवविवाहित सुनेची आत्महत्या
Policemans son commits suicide by shooting himself with revolver
पोलिसाच्या मुलाने रिव्हॉल्वरने गोळी झाडून केली आहत्महत्या
पिंपरी : कंटेनरच्या अपघातातील जखमी मुलीचा मृत्यू
Woman stabbed to death with scissors over family dispute in Kharadi area Pune news
पुणे: कौटुंबिक वादातून महिलेवर कात्रीने वार करुन खून; खराडी भागातील घटना, पती अटकेत

राजेश मंडाले हा बेरोजगार असून त्याचे सोनिया यांच्यासोबत प्रेमसंबंध होते. त्यामुळे त्यांना पहिल्या पत्नीने सोडून दिले. पत्नी दोन मुलासह वेगळी राहायला लागली. त्यानंतर राजेश याने सोनिया हिच्याशी प्रेमविवाह केला. दोघांना १३ वर्षांची मुलगी आहे. सोनिया ही मॉईल कंपनीत अधिकारी पदावर कार्यरत होती. दोघांचा संसार व्यवस्थित सुरु होता. राजेश याला गेल्या तीन वर्षांपासून कँसर आहे. त्याच्यावर पत्नी उपचार करीत होती. मात्र, आजार दिवसेंदिवस वाढतच होता. त्यामुळे तो सतत चिडचिड करीत पत्नीशी वाद घालत होता.

आणखी वाचा-नागपूरकर झोया शेख हिच्या पार्थिवावर बुलढाण्यात मुस्लीम रितीरिवाजाने अंत्यसंस्कार

रविवारी सकाळी त्यांच्यात वाद झाला आणि राजेशने सोनियाच्या डोक्यात हातोड्याने वार करून तिचा खून केला. त्यानंतर त्याने गळफास घेत आत्महत्या केली. त्यांची तेरा वर्षीय मुलगी सकाळी झोपेतून उठली. तिने आईला हाक दिली असता प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तिने बेडरुममध्ये जाऊन बघितले असता वडिल गळफास घेतलेल्या तर आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. तिने मोठ्याने किंकाळी फोडली. त्यामुळे शेजारच्यांनी लगेच धाव घेतली. सदरचे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांना माहिती मिळताच लगेच पथकासह घटनास्थळावर पोहोचले.

पती-पत्नीचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.या प्रकारामुळे मॉईल वसाहतीत खळबळ उडाली आहे. राजेश हा तापट स्वभावाचा होता. त्यामुळे तो पत्नीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत होता. त्यामुळे पत्नीच्या चारित्र्यावरील संशयसुद्धा हत्याकांडाचे कारण ठरल्याची माहिती समोर आली आहे.

Story img Loader