चंद्रपूर : सिंदेवाही व नागभीड तालुक्यात वाघ व बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. सिंदेवाहीत बिबट्या घरात घुसून बसला आहे तर नागभीड वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या मिंडाला वनक्षेत्र, मांगली बीट येथील कक्ष क्र. ७२१ मध्ये वाघाच्या हल्ल्यात किशोर दादाजी वाघमारे (३७) या इसमाला ठार केल्याची घटना उघडकीस आली.
हेही वाचा – नागपूर : दारुड्या मामाची १७ वर्षीय भाचीवर वाईट नजर पडली आणि..
शनिवारी किशोर जंगलात गेला होता. सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घराकडे परत येत असता वाघाने किशोर दादाजी वाघमारे याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह जंगलात पडून होता. सकाळी ६ वाजताच्या सुमारास गावकरी जंगलात गेले असता कक्ष क्र.७२१ मध्ये मृतदेह आढळून आला. मृतकाच्या परिवाराला वन विभागाच्या वतीने २० हजार रुपये तात्काळ मदत स्वरुपात देण्यात आले.
यावेळेस वनपरिक्षेत्र अधिकारी एस. बी. हजारे, क्षेत्र सहाय्यक तावाडे, वनरक्षक सी. एफ. कुथे, जीवतोड, लटपटे, खोब्रागडे, नवघडे आदि उपस्थित होते. पुढील कारवाही वनविभागातर्फे सुरू आहे.