लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुलढाणा : होय! बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील एका भाविक दाम्पत्यावर अशी वेळ आली. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या या दाम्पत्याचे दर्शन आणि त्रिवेणी संगममध्ये स्नानाचे स्वप्न, उत्कट इच्छा अखेर अपूर्णच राहिली. कारने प्रयागराजकडे निघालेल्या या जोडप्याच्या आड अपघातरुपी काळ आला.

मध्यप्रदेशातील कटनीनजीक झालेल्या विचित्र अपघातात पती ( सुभाष लढ्ढा) यांचा मृत्यू झाला .त्यांच्या मृतदेहावर आज शनिवारी सकाळी नांदुरा येथे शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी नांदुरा शहरवासी मोठया संख्येने उपस्थित होते.

गाडीखाली उतरणे बेतले जीवावर

नांदुरा येथील बालाजी सुपर मार्केटचे मालक सुभाष मदनलालजी लढ्ढा (६०) व त्यांची पत्नी सरला लढ्ढा खाजगी वाहनाने आणि मुरलीधर लढ्ढा व त्यांची पत्नी हे दुसऱ्या वाहनाने नांदुरा येथून निघाले होते. रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास मध्यप्रदेशातील कटनी नजीक पोहोचले. त्यावेळी सुभाष लढ्ढा यांच्या वाहनात आवाज येत होता. आपल्या वाहनातून वेगळाच आवाज येत असल्यामुळे ते पाहण्यासाठी खाली उतरले ते गाडीतून उतरून गाडीत आवाज कशाचा येत आहे हे पहात होते. त्याच वेळी मागून भाजीपाला घेवून भरधाव येणाऱ्या मालवाहू बोलोरोने त्यांना धडक दिली. मालवाहू वाहन चालकाने १५-२० फूट फरपटत नेल्याने सुभाष लढ्ढा गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले.

मध्यप्रदेश मधील कटनी येथे शवविच्छेदन करण्यात आल्यावर काल रात्री उशिरा त्यांचा मृतदेह नांदुरा येथे आणण्यात आला. सकाळी नऊ वाजता धनगरपूर स्थित निवासस्थान येथून अंत्ययात्रा काढण्यात आली आहे. सुभाष लढ्ढा यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, मुलगा, मुलगी, पत्नी असा आप्तपरिवार आहे.