अल्पवयीन दिव्यांग बालिकेवर शारीरिक अत्याचार करणाऱ्या नराधमास खामगाव न्यायालयाने मरेपर्यंत कारावासाची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा न्यायाधिश श्रीमती ए.एस. वैरागडे यांनी हा जरब बसविणारा निकाल दिला आहे. सुमारे साडेसहा वर्षापूर्वी जिल्ह्याच्या सामाजिक व धार्मिक क्षेत्रात वानखेड(ता. संग्रामपूर) येथील घटनेने खळबळ उडवून दिली होती.
हेही वाचा >>> भंडारा: चार वर्षांपासून बेपत्ता अर्चनाचा खून; तीन आरोपी अटकेत
मागील १५ डिसेंबर २०१६ रोजी १४ वर्षीय दिव्यांग बालिका रॉकेल घेऊन जात असताना मौलाना सय्यद नाजीम सय्यद अब्दुल कय्युम( ३६) याने तिला बोलविले. यावेळी त्याने तिच्यावर शारीरिक अत्याचार करीत वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. प्रकरणी तामगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासंती प्रकरण खामगाव न्यायालयात दाखल केले. जिल्हा सत्र न्यायाधिश श्रीमती वैरागडे यांच्या समक्ष झालेल्या सुनावणीत १२ साक्षीदार सादर करण्यात आले. सरकार पक्षातर्फे ऍड. रजनी बावस्कर- भालेराव यांनी केलेला युक्तिवाद प्रभावी ठरला. आरोपी सय्यद नाजीम याला न्यायालयाने दुहेरी आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली.