नागपूर : वहिनीसोबत दीराचे सूत जुळले. त्याची कुणकुण मोठ्या भावाला लागली. प्रेमसंबंधात मोठा भाऊ अडसर ठरत होता. त्यामुळे वहिनीचे प्रेम मिळविण्यासाठी लहान भावाने मोठ्या भावाचा पुतण्याच्या मदतीने दगडाने ठेचून खून केला. मृतदेह जंगलात फेकून पळ काढला. मात्र, बुटीबोरी पोलिसांनी मोठ्या शिताफीने हत्याकांडाचा छडा लावून दोघांनाही अटक केली. चंद्रकांत असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.  पंकेश आणि बंटी अशी आरोपींची नावे आहेत.

चंद्रकांत (४०) हा जामठ्यात शेतमजुरी करायचा. त्याला पत्नी व एक मुलगा बंटी आहे. त्याच्या घराशेजारी त्याचा चुलत भाऊ पंकेश (३०) राहतो. चंद्रकांतला दारुचे व्यसन होते.  तो घरातही पत्नी व मुलाशी वाद घालत होता. पतीचे घरात दुर्लक्ष आणि दारुच्या व्यसनाला पत्नी माधुरी (बदललेले नाव) कंटाळली होती.  पंकेश हा विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. त्याचे  माधुरीशी चांगले संबंध होते. मोठा भाऊ चंद्रकांत हा पत्नीचा छळ करीत असल्याची त्याला जाणिव होती. अनेकदा पंकेश हा चंद्रकांत आणि माधुरीचे भांडण सुरु असल्यानंतर त्यांच्या घरी जाऊन भांडण सोडवत होता. माधुरी ही पंकेशसोबत किराणा आणायला, खरेदी करायला किंवा अन्य कामासाठी जात होती. यादरम्यान, दोघांची जवळीक वाढली. प्रेमसंबंध जुळले. याबाबत माधुरीचा मुलगा बंटी यालाही माहिती होती. मात्र, वडिलाचा स्वभाव बघता त्यानेही आईच्या प्रेमसंबंधाला मूकसंमती दिली.

satish wagh murder case mohini wagh and 5 others remanded to police custody till 30 december
खून करण्यामागे कारण आर्थिक की अनैतिक संबंध? सतीश वाघ खून प्रकरणात पत्नीला पोलीस कोठडी
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
youth murder due to love affair in beed
बीड : प्रेम संबंधातून बीड येथील युवकाचा खून करून मृतदेह कालव्यात फेकून दिला
person murder construction worker,
पुणे : टोमणे मारल्याने बांधकाम मजुराचा खून करणाऱ्या एकाला जन्मठेप
Police arrested three men for killing young man on Tuljaram College Road Baramati
बारामतीत तरुणाचा खून करुन पसार झालेले तिघे, गजाआड
Sharad Pawar
“या प्रकरणाचा सूत्रधार…”, मस्साजोगच्या ग्रामस्थांसमोर शरद पवार गरजले; संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत घेतली मोठी भूमिका
Santosh Deshmukh Wife Crying
Santosh Deshmukh : संतोष देशमुख यांच्या पत्नीची साश्रू नयनांनी मागणी, “मुख्यमंत्र्यांनी..”
Santosh Deshmukh Murder Case
Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख यांच्या मुलीचा टाहो; “माझ्या वडिलांना जसं ठार केलं, तशीच कठोर शिक्षा…”

हेही वाचा >>> अमरावती : पाच गुंडांकडून  युवकाची तलवारीने हत्या….सरत्‍या वर्षाच्‍या अखरेच्‍या दिवशी…

अनैतिक संबंधाची पतीला कुणकुण

माधुरी आणि पंकेश या दोघांचे अनैतिक संबंध बरेच वाढले. दबक्या आवाजात वस्तीत दोघांच्या प्रेमाची चर्चा होती. ती चंद्रकांतच्या कानावर आली. त्यामुळे त्याने दोघांवर पाळत ठेवली. महिनाभरापूर्वी शेतावर जाणार असल्याचे सांगून तो तासाभरात घरी परतला. त्यावेळी पंकेश हा त्याच्या घरी आढळून आला. त्यामुळे दोघांनाही चंद्रकांतने मारहाण केली. 

हेही वाचा >>> धक्कादायक! नापास का होतोस? असे विचारले म्हणून  मुलाने आई-वडिलांनाच संपवले..

असा केला खून

वहिनीला नेहमी मारहाण होत असल्यामुळे पंकेशचा जीव तुटत होता. त्याने पुतण्या बंटीला हाताशी धरले आणि चंद्रकांतचा खून करण्याचा कट रचला. सोमवारी रात्री चंद्रकांतला दारु पिण्यासाठी   बोलावले. उमरेड-बुटीबोरी राज्य महामार्गावर नेऊन दारु पाजली. त्यानंतर बंटी आणि पंकेशने चंद्रकांतचा गळा आवळून खून केला. ओळख पटू नये म्हणून त्याच्या चेहरा दगडाने ठेचला. मात्र, दुसऱ्या दिवशी पोलिसांनी तंत्रज्ञान व गुप्त माहितीच्या आधारे हत्याकांडाचा छडा लावला. आरोपींना अटक केली.

Story img Loader